श्री शिवाजी विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा.

श्री शिवाजी विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा.

अकोट (दि.२८/२/२०२५) रोजी,स्थानिक श्री शिवाजी विद्यालयात डॉ सी व्ही रमण यांचा

जन्मदिन राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य संजय वालसिंगे तर प्रमुख उपस्थिती पर्यवेक्षिका अंजलीताई सपकाळ,

Related News

कमवि प्रभारी प्रा कपिल धर्माळे, पूर्व माध्यमिक प्रभारी सुभाष चौधरी, विज्ञान शिक्षक गोपाल वाघमारे,

प्रदीप नागरे, वृंदा अवारे,प्रा रोशनी कराळे, प्रा विद्या आखरे यांची होती. सर्वप्रथम उपस्थित

मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व भाऊसाहेब देशमुख यांच्या पुतळ्यांचे व डॉ सी व्ही रमण यांच्या

प्रतिमेचे पूजन व हारार्पण करण्यात आले. याप्रसंगी वर्ग आठ( क)च्या विद्यार्थिनी वैष्णवी राऊत, प्रियंका आकोटकर,

जानवी कपले, जानवी वालसिंगे,नेहा अस्वार ,सेजल वानखडे, प्रणाली झंझाट, वैष्णवी भावे यांनी

कृत्रिम बुद्धिमत्ता यावर विज्ञान नाटिका सादर केली तर वैष्णवी राऊत आणि प्रियंका आकोटकर

यांनी प्राणी पेशी व वनस्पती पेशी यावरील फरक संवादाद्वारे स्पष्ट केला तर विज्ञान दिनावर शिवानी रोकडे,

नेहा अस्वार, जानवी वालसिंगे,वैष्णवी राऊत, प्रियंका आकोटकर यांनी भाषणे दिली. शिवाजी कॉन्व्हेंटच्या

चिमुकल्या विद्यार्थ्यांनी अर्णव पवार, परी गुप्ता, आरव कराडकर, राही तेलगोटे यांनी विज्ञान प्रात्यक्षिकेद्वारे

प्रयोग सादर केले. याप्रसंगी वृंदा अवारे, प्रा विद्या आखरे, प्राचार्य संजय वालसिंगे यांनी विज्ञान दिनावर माहिती दिली.

कार्यक्रमाचे संचालन जानवी वालसिंगे व नेहा अस्वार यांनी तर आभार प्रदर्शन प्रणाली झंझाट यांनी केले.

कार्यक्रमाला सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.


Read more news here : https://ajinkyabharat.com/sanjay-raut-home-minister-mhanje-divyach-aht-yogesh-kadhanchaya-tya-vasavyavarun-sanjay-raut-bhadkle/

Related News