श्री शिवाजी विद्यालय दादासाहेब काळमेघ पुण्यतिथी व नागपंचमी साजरी.

श्री शिवाजी विद्यालय दादासाहेब काळमेघ पुण्यतिथी व नागपंचमी साजरी.

अकोट येथील स्थानिक श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे माजी

अध्यक्ष तथा माजी कुलगुरू दादासाहेब काळमेघ यांची पुण्यतिथी व नागपंचमी कार्यक्रम साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य संजय वालसिंगे तर प्रमुख उपस्थिती उपमुख्याध्यापक भास्कर खंडारे,

अंजलीताई सपकाळ यांची होती.सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व शिक्षण

महर्षी भाऊसाहेब देशमुख यांच्या पुतळ्यांचे व स्व दादासाहेब काळमेघ यांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण करण्यात आले.

यानंतर वृंदा अवारे,अंजलीताई सपकाळ,प्राचार्य संजय वालसिंगे यांनी स्व दादासाहेब काळमेघ यांच्या जीवन

व कार्यावर तसेच नागपंचमीनिमित्त नागाचे महत्त्व सांगितले.कार्यक्रमाचे संचालन पंकज गिरी,

सोहनी गोतमारे, एकता किरकाळे यांनी तर आभार प्रदर्शन सुबोध कराळे,

व जीविका चौधरी यांनी केले.कार्यक्रमाला सुबोध कराळे, शरद हिंगणकर,प्रदीप नागरे,

पंकज गिरी, सुभाष गुगळे, वंदना रावणकार, कल्याणी चौधरी, दिपाली वडजे,विद्या आखरे,

मीनाताई पिवतकर, वृंदा अवारे, अमृता नवले तसेच सर्व शिक्षक, शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Read Also : https://ajinkyabharat.com/shiv-sena-paksha-principal-uddhav-thackeray-yancha-vaddivas-miscellaneous-social-undertaking-2/