श्री शिवाजी हायस्कूल तेल्हारा येथे शाळा शुभारंभ उत्साहात साजरा

श्री शिवाजी हायस्कूल तेल्हारा येथे शाळा शुभारंभ उत्साहात साजरा

तेल्हारा प्रतिनिधी
श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावतीच्या

वतीने संचालित श्री शिवाजी हायस्कूल

तेल्हारा आणि श्रीमती पार्वतीदेवी तापडिया कॉन्व्हेंट,

Related News

तेल्हारा यांच्या संयुक्त विद्यमाने सत्र 2025-2026 चा

शाळा प्रवेश व शुभारंभ दिन मोठ्या

उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री रमेशभाऊ कोकाटे

(आजीव सदस्य) होते, तर आभासी पद्धतीने

कार्यकारिणी सदस्य श्री सुरेशदादा खोटरे यांनी

आपली उपस्थिती दर्शविली.

यावेळी सौ. प्रेरणाताई कराळे (शिक्षक प्रतिनिधी),

सौ. विद्याताई देशमुख (मुख्याध्यापिका),

श्री. साहेबराव सोनमाळे (आजीव सदस्य),

श्री. गजानन गावंडे (शिक्षकेतर प्रतिनिधी),

ज्येष्ठ शिक्षक श्री. शांतीकुमार सावरकर,

तसेच अनेक पालक व मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमात नव्याने शाळेत प्रवेश घेतलेल्या

विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच शालेय

पुस्तकांचे वाटपही करण्यात आले.

कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन श्री बळीराम कुवारे सर यांनी केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री सुनील वंजारी, श्री बी. जी. पवार,

श्री तुषार जाधव, भारत भोयर, अंकेश

भांबुरकर, धनंजय भंगाळे, तेजराव कडू,

विजय दहे, सौ कविता सोनमाळे,

कु. समीक्षा जामोद, कु. प्रीती नेमाडे,

कु. अंकिता देशमुख, कु. नेहा चितोडे, श्रीमती

भटकर ताई आणि श्रीमती देशमुख मॅडम यांनी परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री सुनील

वंजारी यांनी केले. भर पावसातही विद्यार्थ्यांनीशळेचा पहिला दिवस मोठ्या आनंदात व उत्साहात साजरा केला

Related News