अकोट: भारताचे पहिले माजी उपराष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची 137 वी जयंती आणि शिक्षक दिन श्री.शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, दर्यापूर रोड, अकोट येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील पांडे सर होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य डॉ. संजय कोल्हे सर तसेच कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. संजय पट्टेबहादूर सर उपस्थित होते.
शिक्षक दिनानिमित्त अनेक विद्यार्थ्यांनी भाषणे करून शिक्षकांप्रती आदर व्यक्त केला. प्राचार्य डॉ. पांडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत शिक्षणाचे महत्त्व स्पष्ट केले.
कार्यक्रमाला उपस्थित शिक्षकांमध्ये प्रा. अर्चना कुचे, प्रा. प्रफुल देशमुख, प्रा. परीक्षेत मेतकर, प्रा. निलेश रहाटे, प्रा. आशिष वनकर, प्रा. मंगेश अवचट, प्रा. मंगेश राऊत, प्रा. सौदागर भिसे, प्रा. चेतन चुने यांचा समावेश होता.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीक्षा खंडारे आणि तन्वी हिंगणकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन रजनी भारसाकळे यांनी केले.
या कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांनी शिक्षकांप्रती आदर व कृतज्ञता व्यक्त केली आणि शिक्षक दिनाच्या औचित्याचा सन्मान केला.
read also :https://ajinkyabharat.com/risod-shaharat-eid-miladunnabi-for-the-grand-calm/