श्री संत सावता महाराज यांची पुण्यतिथी साजरी

श्री संत सावता महाराज यांची पुण्यतिथी साजरी

आलेगाव दिनांक २५ प्रतिनिधी येथील कानिफनाथ महाराज मंदिरामध्ये ह.भ.पा.कानिफनाथ

महाराज भजनी मंडळा तर्फे श्री संत सावता महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.

श्री संत सावता शिरोमणी महाराज हे वारकरी संप्रदायातील एक महत्वाचे संत होते त्यांचा जन्म १२ व्या शतकामध्ये झाला.

ते एक शेतकरी होते ते विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते.कर्म हेच इशपुजा यावर त्यांचा अगाध विश्वास असल्यामुळे ते शेतीकाम करताना

विठ्ठलाच्या भक्तीमध्ये तल्लीन होऊन जायचे ते उत्तम मराठी कवी व अभंग रचनाकार होते.

त्यांनी आपल्या ज्ञानातून सर्व सामान्यांना आत्मोन्नतीचा मार्ग दाखविला.अशा श्री संत सावता शिरोमणी महाराज यांचे विचार तेवत रहावे

या अनुषंगाने येथील श्री कानिफनाथ भजनी मंडळाने २३ जुलै त्यांच्या पुण्यतिथी निमित्त कानिफनाथ महाराज मंदिरामध्ये

त्यांच्या प्रतिमेचे भाविक भक्तांनी पूजन केले. व पालखी सह गावातून मिरवणूक काढण्यात आली

असता चौका चौकामध्ये महिलांनी पालखीचे स्वागत करून पूजा अर्चा केली.मिरवणुकीमध्ये भजनी मंडळ

यांनी श्री संत सावता महाराज यांचा जयजयकार करून त्यांच्या अभंगाचे काव्य वाचन केले.

या वेळी अनेक भाविक महिला पुरुष मंडळींचा मोठा सहभाग होता.

Read Also : https://ajinkyabharat.com/polisadada-tumhi-tari-jagte-wha-phatake-podanya-bulletavar-karachi-mohim-tivra-karani-karani-magani/