पिंपळखुटा येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवनी समाधी सोहळ्याला प्रारंभ

पिंपळखुटा

पातुर तालुक्यातील पिंपळखुटा येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवनी समाधी सोहळा प्रारंभ झाला आहे. या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन ज्ञानराज माऊली भजनी व पिंपळखुटा गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.

सप्ताहाचे उद्घाटन ह.भ.प. निवृत्ती महाराज बोराडे उमरा यांच्या हस्ते झाले. उद्घाटन प्रसंगी ध्वजारोहण, ग्रंथपूजन, गोपूजन यासह विविध धार्मिक विधी पार पडले. यंदा हा सप्ताह ४५ वा वर्ष साजरा केला जात आहे.

या सोहळ्यात व्यासपीठ नेतृत्व करत आहेत ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज कव्हळे, रामेश्वर महाराज कव्हळे, शिवलाल महाराज कव्हळे.

Related News

दैनंदिन कार्यक्रमाचे वेळापत्रक:

  • सकाळी ५ ते ६: काकडा, विष्णू सहस्त्रनाम

  • सकाळी ८ ते ११: सामुदायिक ज्ञानेश्वरी पारायण

  • ११ ते १: भोजन व विश्रांती

  • दुपारी २ ते ५: ज्ञानेश्वरी पारायण

  • सायंकाळी ६ ते ७: हरिपाठ

  • रात्री ८ ते १०: विशेष कीर्तन

विशेष कीर्तन व वक्ते:

  • ११ नोव्हेंबर (मंगळवार): ह.भ.प. हरिभाऊजी महाराज मेहुनकर, मुक्ताईनगर

  • १२ नोव्हेंबर (बुधवार): ह.भ.प. अमोलजी महाराज घुगे, आळंदी

  • १३ नोव्हेंबर (गुरुवार): ह.भ.प. गणेशजी महाराज सरनाईक, आळंदी

  • १४ नोव्हेंबर (शुक्रवार): ह.भ.प. शिवराजजी महाराज पवार, बुलढाणा

  • १५ नोव्हेंबर (शनिवार): ह.भ.प. केशवजी महाराज मोरे, म्हैसपुर अकोला

  • १६ नोव्हेंबर (रविवार): ह.भ.प. ओमजी महाराज मालवाडे, आळंदी

  • १७ नोव्हेंबर (सोमवार): ह.भ.प. रविंद्रजी महाराज खेडकर, खामगांव

  • १८ नोव्हेंबर (मंगळवार): ह.भ.प. शेषरावजी महाराज हाने, अजनी

  • १९ नोव्हेंबर (बुधवार): सकाळी १० ते १२: ह.भ.प. योगेशजी महाराज पाचपोर, राहेर (गुप्तेश्वर आश्रम शिर्ला)

सोहळा १९ नोव्हेंबर रोजी महाप्रसादाने संपन्न होणार असून पंचकोशीतील भाविकांनी या सर्व कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

विशेष कार्यक्रम:

  • १८ नोव्हेंबर, सायंकाळी ७ वाजता: संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त दीपोत्सव व गायत्री महायज्ञ

  • १९ नोव्हेंबर, सायंकाळी ५ ते ८: ग्रंथदिंडी मिरवणूक, ज्यात ज्ञानराज माऊली भजनी मंडळाचा पाऊली खेळण्याचा सहभाग

  • मिरवणुकीनंतर: भारुडाचा कार्यक्रम

या सोहळ्यातील विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे परिसरातील भाविक व भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

read also: https://ajinkyabharat.com/channi-police-station-gavthi-daru-addyawar-motha-raid-goods-worth-rs-88500-seized/

Related News