अकोला | प्रतिनिधी
दिनांक ६ एप्रिल २०२५ रोजी श्रीराम नवमीच्या शुभमुहूर्तावर अकोला शहरात विविध धार्मिक
कार्यक्रम आणि शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे.
Related News
‘मोनिका ओ माय डार्लिंग’… ८६ व्या वर्षीही हेलेन यांचा जलवा कायम;
‘१२वी नापास, पण मोठमोठ्या वेबसाईट्स हॅक करणारे’
नवीन बस स्थानक टी पॉइंटवर अपघाताचा थरार;
शिवरमध्ये जागतिक शून्य सावली दिन संत विचारधनाने साजरा;
अकोल्यात झिरो शॅडो डेचा अनुभव; नागरिक म्हणाले – सावलीच नाहीशी झाली!
२४ मे २०२५ चं हवामान : वीकेंडला मुसळधार पावसाचा इशारा,
ऑपरेशन सिंदूरवरून प्रेरित ‘स्पेशल बनारसी साडी’;
पटना-गया आणि बक्सर दरम्यान लवकरच धावेल ‘नमो भारत एक्सप्रेस’;
“इंग्लंडचा रणसंग्राम! पहिल्याच दिवशी 498 धावा,
“वादळी वारे, मुसळधार पाऊस आणि रेड अलर्ट:
“पाकिस्तानच्या ‘पाण्याच्या’ धमकीवर भारताचा संताप;
“आर्यन खान तुरुंगात फक्त फळं आणि पाण्यावर;
श्रीराम मंदिरासह संपूर्ण शोभायात्रेच्या मार्गावर मनमोहक आणि धार्मिक झांक्यांचे दर्शन घडत असून,
या झांक्या नागरिकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहेत.
शहरातील गांधी चौकात राम दरबार, तर सिटी कोतवाली
चौकात कालिया मर्दनाची चलित झांकी साकारण्यात आली आहे.
या कलात्मक आणि भक्तिभावपूर्ण झांक्यांमुळे संपूर्ण शहरात धार्मिकतेचं वातावरण निर्माण झालं आहे.
श्रीराम नवमीची मुख्य शोभायात्रा दिनांक ६ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता अकोल्याच्या
आराध्य देवता श्री राजराजेश्वर मंदिरापासून शुभारंभ होणार आहे.
ही यात्रा बड्या पुलावरून, तिलक रोड, कपडाबाजार, गांधी मार्ग मार्गे सिटी
कोतवालीच्या मागे असलेल्या मंदिरापर्यंत पोहोचणार आहे.
या संपूर्ण मार्गावर विद्युत रोषणाईने सजवलेली झाकी आणि विविध धार्मिक लहानथोरांना आकर्षित करत आहेत.
तसेच, शहरातील पुरातन बिरला गेट क्र. २ वर आकर्षक
विद्युत रोषणाईने सजावट करण्यात आली असून,
राम भक्तांसाठी हा देखावा एक विशेष आकर्षण ठरत आहे.
शोभायात्रेच्या सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासनानेही चोख बंदोबस्त ठेवला आहे.
शहरातील विविध सामाजिक व धार्मिक संस्था या कार्यक्रमात सहभागी होऊन भक्तीभाव वाढवत आहेत.