श्री ब्रह्मचारी महाराज यांची मूर्ती प्राणप्रतिष्ठा श्री तिर्थक्षेत्र पानेट पिलकवाडी

श्री ब्रह्मचारी महाराज यांची मूर्ती प्राणप्रतिष्ठा श्री तिर्थक्षेत्र पानेट पिलकवाडी

टाकळी बु

अकोट अकोला मार्गावरील चोहोट्टा बाजार जवळ पूर्णा नदीच्या काठावर श्रीक्षेत्र पानेट आहे.

पूर्णा नदी म्हणजे पुरातन काळातील पयोष्नी नदी येथे विश्वेश्वर महादेवाचे स्वयंभू स्थान आहे.

लंका विजयानंतर अयोध्येस परत जाताना प्रभू श्रीरामचंद्रांनी श्रीक्षेत्र पानेट येथे शंभू महादेवासमोर यज्ञ केला होता.

येथून जवळच पळसोद येथे पाराशर ऋषींचा आश्रम होता. ते येथे दर्शनास येत असत.

पयोष्नी या नदीच्या काठी अनेक ऋषीमुनींनी तपश्चर्या केलेली आहे.

या ठिकाणी श्रीमंत दुसरे नानासाहेब पेशवे यांना श्री स्वामी समर्थ महाराज यांचा अनुग्रह झाला तुम्हीं आता

तपश्चर्या करून सिद्धी प्राप्त करा त्यांनी ते ऐकून या निमिष्यारण्यातील पायोषणी मातेच्या तीरावर पानेट पिलकवाडीया ठिकाणची निवड केली तेच आता महान तपस्वी श्री ब्रह्मचारी महाराज संत होऊन गेले.

श्री संत ब्रह्मचारी महाराज हे एक साधक होते त्यांनी आपल्या साधनेसाठी पयोष्णी नदीच्या तिरावर या ठिकाणची निवड केली.

,मग त्यांना पिलकवाडी येथिल मोडक परिवारातील लोकांनी साथ दिली, मोडक परिवार हे महाराजांचे भक्त झाले.

श्री नामदेव मोडक यांनी महाराजांना तनाची झोपडी करून दिली,त्यात महाराज राहून साधना करत असत .

श्री नामदेव मोडक हे महाराजंसाठी स्वतःच्या घरून कास्याच्या पात्रात दूध आणत असत.महाराज इतर अन्न न घेता, फक्त त्या दुधावरच राहत असत,.

म्हणुन त्यांना कोणी दुधावरी बुवा,कोणी ब्रह्मचारी होते म्हणुन ब्रह्मचारी महाराज म्हणत असत.

आणि झोपडी राहत म्हणुन पानेटला झोपडी म्हणत होते. श्री ब्रह्मचारी महाराज हे शिवभक्त होते ते वारी हनुमानच्या डोहात उडी घेऊन आठ दिवसांनी परत येत होते .

कोणी त्यांना विचारले असता तर ते काशीला गेलो होतो सांगत असत. ब्रह्मचारी महाराजांना त्यांचे जिवन कार्य संपण्याआधी साक्षात्कार झाला.

तिथे खोद मी तिथे आहे खोदले तर श्री काशी विश्वेश्वर लिंग निघाले. महाराजांनी काही वर्ष उत्सव सप्ताह केले.

तेव्हापासूनच महाशिवरात्री यात्रा महोत्सव ची सुरूवात व प्रथा झाली . हा उत्सव महाराजांची पुण्यतिथी सोहळ्या पासुन महाशिवरात्री पर्यंत सप्ताह असतो

आता संस्थान चे कर्तव्यदक्ष अध्यक्ष श्री मनीष भाऊ मोडक आणि विश्वस्त यांनी तनाच्या झोपडी ठिकाणी आता सिमेंट ची झोपडी बांधकाम केले

आता 31 तारीख ला या झोपडीत नविन श्री संत ब्रह्मचारी महाराज यांची मूर्ति स्थापना होणार आहे अनेक वर्षाचे स्वप्न पूर्ण होणार आहे तरी सर्वांनी उपस्थित राहावे.

श्री गजानन महाराज शेगाव व श्री नरसिंग महाराज अकोट हे अधून मधून श्री ब्रह्मचारी महाराजांच्या भेटीस श्रीक्षेत्र पानेट येथे येत असत. व या संतांमध्ये हितगुज होत असे.

शके 1822 सोमवती दिनांक 18 फेब्रुवारी 1901 ला श्री गजानन महाराज अंदुरा येथे पयोष्णी नदीत स्नान करून श्रीक्षेत्र पानेट येथे आले होते.

श्री संत बायजाबाई नी इथे देह ठेवला आहे.

मागील काही वर्षात दुर्लक्षित असलेले श्री मारुती व श्री ब्रह्मचारी महाराज संस्थान,श्री क्षेत्र पानेट याबद्दल भक्तांना फारशी माहिती नव्हती.

परंतु येथील विश्वस्त मंडळ यांनी अथक परिश्रम घेऊन हे पवित्र स्थळ प्रकाश झोतात आणले.

आध्यात्मिक व धार्मिक कार्याबरोबरच या संस्थानाच्या माध्यमातून कृषी आरोग्य शैक्षणिक, सांस्कृतिक व पर्यावरणावर आधारित बरेच समाज उपयोगी उपक्रम राबविण्यात येतात.

दिनांक 31 जुलै 2025 गुरुवार रोजी सकाळी 9 ते 2वाजेपर्यंत मूर्ती प्राणप्रतिष्ठा 2ते महाप्रसादाचे आयोजन केले आहे.

तरी
भक्तांनी या पवित्र स्थळाला भेट देऊन माप्रसादाचा लाभ घ्यावा.