श्री नारायण बहुउद्देशीय संस्था “संविधानाचा जागर” उपक्रम राबविणार! प्रजासत्ताक दिनी उपक्रमाचा मान्यवरांच्या हस्ते श्रीगणेशा

श्री नारायण बहुउद्देशीय संस्था "संविधानाचा जागर" उपक्रम राबविणार! प्रजासत्ताक दिनी उपक्रमाचा मान्यवरांच्या हस्ते श्रीगणेशा

मूर्तिजापूर: भारतीय संविधानाला यावर्षी ७५ वर्षे पूर्ण होत असून, देशभरात भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा केला जाणार आहे.

या महोत्सवानिमित्त, श्री नारायण बहुउद्देशीय संस्था, खापरवाडा यांच्या वतीने “संविधानाचा जागर” हा अभिनव उपक्रम राबविण्यात येणार आहे.

या उपक्रमा अंतर्गत मुर्तिजापूर तालुक्यातील नागरिकांमध्ये भारतीय संविधानाचा प्रचार, प्रसार आणि जनजागृती होण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत.

Related News

तसेच, ग्रामीण भागातील तरुणांना भारतीय संविधान सहज उपलब्ध व्हावे यासाठी प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालय,

जिल्हा परिषद शाळा, आणि पोलीस स्टेशनला संविधानाची प्रत भेटस्वरूपात प्रदान केली जाणार आहे.

“संविधानाचा जागर” या उपक्रमाची सुरुवात येत्या २६ जानेवारी २०२५ रोजी, प्रजासत्ताक दिनी, मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.

या अभिनव उपक्रमाद्वारे भारतीय संविधानाची जनजागृती आणि प्रचार-प्रसार संपूर्ण मुर्तिजापूर तालुक्यात करण्यात येईल.

संस्थापक अध्यक्ष सतिश गवई यांनी तालुक्यातील संविधानप्रेमी नागरिकांना या उपक्रमात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे.

“संविधानाचा जागर” हा उपक्रम संविधानाच्या महत्त्वाची जाणीव करून देण्यासाठी आणि त्याचा प्रसार करण्यासाठी एक आदर्श पाऊल ठरेल.

इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also :https://ajinkyabharat.com/13-year-old-young-mulichaa-vinaybhang/

Related News