श्रावण महिन्यात राणी सती दादी मंदिरात झुलातीज उत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

श्रावण महिन्यात राणी सती दादी मंदिरात झुलातीज उत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

श्रावण महिन्यानिमित्त अकोल्यातील श्री राणीसती दादी मंदिरात महिलांनी पारंपरिक पद्धतीने झुलातीज उत्सव साजरा केला.

मंदिर परिसरात विविध रंगीबेरंगी झोके सजवण्यात आले होते. या झोक्यांवर बसून महिलांनी श्रावणाचा आनंद लुटला.

या कार्यक्रमात तरुणीं पासून ते ज्येष्ठ महिलांपर्यंत सर्वांनी उत्साहाने सहभाग घेतला. पारंपरिक गाणी, फुगड्या, आणि गप्पांच्या

रंगात सारा परिसर श्रावणमय झाला होता. श्रावण महिन्यातील ही परंपरा दरवर्षीप्रमाणे यंदाही भक्तिभावाने पार पडली.

मंदिर समितीच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि सर्व सोयी-सुविधांची काळजी घेतली गेली होती.

महिलांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंदच या उत्सवाच्या यशस्वीतेची साक्ष देत होता.

Read Also : https://ajinkyabharat.com/shetkari-suicide/