कोटक महिंद्रा बँकेच्या ग्राहकांना झटका!

बचत खात्यावरील व्याजदरात कपात

खासगी क्षेत्रातील कोटक महिंद्रा बँकेने बचत खाते असलेल्या

ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. बँकेने पाच लाख रुपयांपेक्षा

Related News

कमी शिल्लक असलेल्या बचत खात्यांवरील व्याजदरात कपात

करण्याची घोषणा केली आहे. कोटक महिंद्रा बँकेच्या

वेबसाइटनुसार, नवीन व्याजदर १७ ऑक्टोबर २०२४ पासून

लागू झाले आहेत. बँकेने सादर केलेल्या नव्या ब्रेकेटमध्ये ही

व्याजदरात कपात करण्यात आली आहे. कोटक महिंद्रा बँकेने

एक नवीन ब्रैकेट सादर केले आहे. या अंतर्गत पाच लाख

रुपयांपेक्षा कमी बचत खात्यांवरील व्याजदरात ५० बेसिस

पॉईंटची कपात करण्यात आली आहे. व्याजदर ३.५ टक्क्यांवरून,

३ टक्के करण्यात आला आहे. यापूर्वी बँकेच्या बचत खात्याचे

दोनच स्लॅब होते. पहिल्या स्लॅबमध्ये ५० लाख रुपयांपेक्षा कमी

ठेवींवर ३.५ टक्के आणि ५० लाख रुपयांपेक्षा जास्त ठेवींवर ४

टक्के व्याज दर होता.

मात्र, आता बँकेने तीन स्लॅब तयार केले आहेत. त्यातील एक

स्लॅब पाच लाख रुपयांपेक्षा कमी रकमेचा आहे. त्याचा व्याजदर

वार्षिक ३ टक्के आहे. तर ५ लाख ते ५० लाख रुपयांपर्यंतच्या

रकमेवर ३.५ टक्के व्याज दर आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/big-investment-in-adar-punawalanchi-bollywood/

Related News