शिवराज सिंहांचा तुटलेल्या सीटवरुन विमान प्रवास; मंत्री संतप्त, Air India, टाटाला धरलं धारेवर

शिवराज सिंहांचा तुटलेल्या सीटवरुन विमान प्रवास; मंत्री संतप्त, Air India, टाटाला धरलं धारेवर

शिवराज सिंहांचा तुटलेल्या सीटवरुन विमान प्रवास;

मंत्री संतप्त, Air India, टाटाला धरलं धारेवर

नवी दिल्ली: मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी

एअर इंडियाच्या सेवेवर सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली.

त्यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्स वर एक पोस्ट शेअर करत सांगितले की त्यांना भोपाळ ते दिल्ली

Related News

जायाचे होते मात्र त्यांना एक तुटलेली सीट मिळाली. ज्यावर बसणे वेदनादायक होते.

यासंबंधी त्यांनी पोस्ट करत एअर इंडिया आणि टाटा व्यवस्थापनाला खडे बोल सुनावले आहे.

यावर एअर इंडियाकडून उत्तर दिले गेले. ते एआय जनरेटेड असल्यासे म्हटले जात आहे.

शिवराज सिंह चौहान यांची पोस्ट

केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आपल्या एक्स हँडलवर लिहिले की,

मला भोपाळ ते दिल्ली प्रवास करायचा होता. पूसा येथे शेतकरी मेळाव्याचे उद्घाटन करायचे होते.

मी एअर इंडियाच्या फ्लाइट क्रमांक AI436 चे तिकीट काढले. मला ८C क्रमांकाची सीट देण्यात आली.

मी जाऊन सीटवर बसलो, तर ती सीट तुटलेली होती आणि आत खोलवर गेली होती. सीटवर बसणे वेदनादायक होते.

ज्यावेळी मी विमान कर्मचाऱ्यांना विचारलं की अशी सीट का देण्यात आली.

त्यावेळी त्यांनी सागितले की आम्ही व्यवस्थापनाला अगोदरच माहिती दिली होती की सीट चांगल्या अवस्थेत नाही

.याची तिकीट विक्री केली नाही पाहिजे. अशा एक नाही तर अजून काही सीट्स आहेत.

 

टाटा व्यवस्थापन, एअर इंडिया, गैरसमज

सहप्रवाश्यांनी मला त्यांची सीट देण्याचा आग्रह केला मात्र मी माझ्यासाठी त्यांना सीट का देऊ,

मी निर्णय घेतला की त्याच सीटवर बसून प्रवास करीन. टाटा व्यवस्थापनाकडे आल्यानंतर एअर इंडियाची सेवा चांगली झाली असेल.

असे माझे मत होते मात्र हा माझा गैरसमज होता. बसताना होणाऱ्या त्रासाची मला चिंता नाही पण प्रवाशांना

पूर्ण पैसे आकारुन त्यांना खराब आणि त्रासदायक सीटवर बसवणे अनैतिक आहे. ही प्रवाशांची फसवणूक नाही का ?

भविष्यात कोणत्याही प्रवाशाला अशी गैरसोय होऊ नये म्हणून एअर इंडिया व्यवस्थापन ठोस

पावले उचलेल का की प्रवाशांना लवकर पोहचण्याचा नाईलाजाचा फायदा घेतला जाईल.

Read more here

https://ajinkyabharat.com/sonyacha-dar-awakyabaher-jagavachaya-suvarnagrit-krishnagi-sainikharedikde-text/

Related News