शिवनेरीवरून मनोज जरांगेंचं मोठं विधान

शासनाची अट मान्य पण मागण्यांवर ठाम!

 शिवनेरीवरून मनोज जरांगेंचं मोठं विधान

मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त करताना मनोज जरांगे पाटील

यांनी शिवनेरीच्या पायथ्यावरून मोठं विधान केलं आहे.

“आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील.

शासनाची पाच हजार आंदोलकांची अट आम्हाला मान्य आहे,

पण मागण्या मान्य झाल्याशिवाय शांत बसणार नाही,” असं त्यांनी स्पष्ट केलं.

आज शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाचे दर्शन घेऊन

ते मुंबईकडे रवाना झाले. जुन्नर येथे बोलताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आवाहन केलं की,

“अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलनाची परवानगी द्यावी.

म्ही नियमात राहून आंदोलन करू व कायद्याचं पालन करू.”

मुंबई पोलिसांनी २९ ऑगस्ट रोजी आझाद मैदानावर सकाळी ९ ते संध्याकाळी ६ या वेळेत

आंदोलनासाठी परवानगी दिली आहे.

मात्र, एकावेळी फक्त पाच हजार आंदोलकांनाच उपस्थित राहण्याची अट आहे.

यावर प्रतिक्रिया देताना जरांगेंनी सांगितलं की,

“ते पाच हजार म्हणतात तर आम्ही चार हजार बसू, बाकी इतर मैदानात बसू;

पण मी मागे हटणार नाही.”

मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले की –


1️⃣ मराठा-कुणबी एक आहेत याची अंमलबजावणी करा.

2️⃣ हैदराबाद गॅझेटियर लागू करा.

3️⃣ सगे-सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करा.

4️⃣ आरक्षण आंदोलनातील सर्व गुन्हे मागे घ्या.

5️⃣ कायद्यात बसणारं आरक्षण द्या.

मराठा समाजाला न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा ठाम इशारा त्यांनी दिला आहे

read also :  https://ajinkyabharat.com/junnarjava-andwalkala-heart-attack/