महाराष्ट्रात हिल्यांदाच बसमध्ये प्रवाशांची मदत करण्यासाठी
महिला मदतनीस नेमली जाणार आहे. मुंबई-पुणे मार्गावर
धावणाऱ्या एसटीच्या ई शिवनेरी बसमध्ये प्रवाशांना मदत
Related News
अकोट ग्रामीण पोलीसांची जलद कारवाई – विनयभंग प्रकरणातील आरोपीविरोधात २४ तासांत दोषारोपपत्र दाखल
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
करण्यासाठी हवाई सेवेच्या धर्तीवर आदरातिथ्य व्यवस्थापनाची
सेवा देणारी परिचारिका म्हणजेच, शिवनेरी सुंदरी नेमण्यात येणार
आहे. प्रवाशांच्या तिकिटावर कोणताही अधिभार (ज्यादा दर) न
लावता प्रवाशांना चांगल्या सुविधा देऊन गुणात्मक सेवेचा दर्जा
उंचावेल अशी अभिनव योजना भविष्यात सुरू करण्यात येणार
आहे. असे प्रतिपादन एस टी महामंडळाच अध्यक्ष भरत गोगावले
यांनी महामंडळाच्या 304 व्या बैठकीमध्ये केले. एसटी
महामंडळाचे नवे अध्यक्ष भरत गोगावले यांच्या अध्यक्षतेखाली
304 वी संचालक मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये
विविध खात्याच्या तब्बल 70 पेक्षा जास्त विषयांवर चर्चा होऊन
त्यांना मान्यता देण्यात आली. त्यापैकी, मुंबई-पुणे मार्गावर
धावणाऱ्या ई- शिवनेरी बसमध्ये प्रवाशांना मदत करण्यासाठी
परिचारिका नेमण्यास मान्यता देण्यात आली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतील स्वर्गीय आनंद दिघे
यांच्या स्मरणार्थ एसटीच्या 343 बस स्थानकांवर ‘आनंद आरोग्य
केंद्र’ या नावाने दवाखाना सुरू करण्यात येणार असून, अत्यंत
माफक दरामध्ये बस स्थानकांवरील प्रवाशांसोबतच आसपासच्या
सर्व नागरिकांना कमी दरामध्ये विविध आरोग्य चाचण्या व औषधे
एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी
संबंधित संस्थांना बस स्थानकांवरील 400 ते 500 चौसेमीची
जागा उपलब्ध करून देण्यात येईल. तेथे त्या संस्थेने आरोग्य
तपासणी दवाखाना, पॅथॉलॉजी लॅब व औषध दुकान सुरू करून
सेवा द्यावयची आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/farmers-protest-against-hailstorm-in-akola-district/