शिवाजी सावंतांनी शिवसेना सोडली, भाजप प्रवेश निश्चित

शिवाजी सावंतांनी शिवसेना सोडली

सोलापुरात भाजपची शिंदेंच्या शिवसेनेवर कुरघोडी

सोलापूर : राज्याच्या राजकारणात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणे झपाट्याने बदलू लागली आहेत.

महायुतीतील नाराजी आणि अंतर्गत गटबाजी यामध्ये आता शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे.

सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजी सावंत (भाजप मंत्री तानाजी सावंत यांचे बंधू) यांनी शिंदे गट सोडला असून ते लवकरच भाजपात प्रवेश करणार आहेत.

त्यांच्यासोबत माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांच्यासह अनेक पदाधिकारीही भाजपमध्ये दाखल होणार आहेत.

 शिवाजी सावंत यांच्यावर सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख पदाची जबाबदारी होती.

मात्र पक्षातील अंतर्गत राजकारण आणि नाराजीमुळे काही दिवसांपूर्वी त्यांनी पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आता त्यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रवेश

येणाऱ्या दोन दिवसांत सोलापुरातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा होणार असून मोठ्या संख्येने शिवसेना (शिंदे गट) पदाधिकारी,

युवासेना आणि महिला आघाडीचे कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करतील.

शिंदे गटात टीकाटिप्पणी सुरू

दरम्यान, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी भाजपात जाणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर उपरोधिक टीका करताना,

“त्यांच्या घरात सुखी राहा” असा टोला लगावला. तसेच हा त्यांचा वैयक्तिक निर्णय असल्याचेही स्पष्टीकरण त्यांनी दिले.

राजकीय परिणाम

सोलापूर जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाचे संख्याबळ आधीच कमी असून, आता जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांनीच भाजपचा झेंडा हातात घेतल्याने आगामी

महानगरपालिका, पंचायत आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये भाजपला मोठा फायदा होणार असल्याचे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे.

 विशेष म्हणजे आमदार आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांनी शिवसेना बंडात सक्रिय भूमिका बजावली होती.

मात्र, मंत्रिपद न मिळाल्याने त्यांची नाराजी उफाळून आली होती. आता त्यांच्या भावाच्या भाजप प्रवेशामुळे शिवसेना शिंदे गटात मोठ्या प्रमाणात अस्वस्थता पसरली आहे.

Read also : https://ajinkyabharat.com/25-varshanchi-shivbhchachi-tradition-maintained/