अकोला, दि.6 : नुकतीच दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर महाविद्यालयीन जीवनाचा प्रारंभ
करण्यासाठी अनेकांनी अकरावीत प्रवेश घेतला. शिवाजी महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या अकरावीच्या विद्यार्थ्यांना
स्वागत समारंभ पाहून सुखद धक्का बसला. आपला प्रवेश एवढा थाटात होईल असे वाटले नव्हते,
अशा विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रात ऑनलाइन पद्धतीने वर्ग ११वी ची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे.
ज्या विद्यार्थ्यांनी शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय अकोला येथे कला,
वाणिज्य व विज्ञान शाखेत प्रवेश घेतला त्यांच्या स्वागताचा कार्यक्रम मार्गदर्शन पर व्याख्यान व सांस्कृतिक
कार्यक्रमाने संपन्न झाला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष केशवराव मेतकर होते.
प्रमुख पाहुणे शिवाजी महाविद्यालय अकोला येथील स्कूल कमिटी मेंबर नानासाहेब देशमुख उपस्थित होते.
शिवाजी शिक्षण संस्थेचे संनियंत्रण अधिकारी अरविंद मंगळे, डॉ.अविनाश बोर्डे (सेवा निवृत्त प्राचार्य शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय राजंदा ),
डॉ.रामेश्वर भिसे (प्राचार्य शिवाजी महाविद्यालय अकोला ),प्रा.सुशीला मळसने (शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय प्रमुख ),
डॉ.अर्चना पोटे (कला विभाग प्रमुख ), डॉ.अस्मिता बढे (वाणिज्य विभाग प्रमुख ),प्रा.श्रीकृष्ण तराळे (विज्ञान विभाग प्रमुख ),
प्रा.रूपाली सरोदे (सांस्कृतीक विभाग प्रमुख ) विचार पिठावर उपस्थित होते.सर्व प्रथम लेझीम,
मशाल व ग्रंथ दिंडी काढून कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थीनींनी पाहुण्यांचे स्वागत केले.
नंतर ‘कमवा व शिका’या उपक्रमा अंतर्गत अर्थशास्त्र विषयाच्या डॉ.अर्चना पोटे यांच्या राखी च्या प्रदर्शनीचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
सर्व मान्यवरांचे स्वागत गिताने व रोपटे देऊन स्वागत करण्यात आले व सेवा निवृत्त प्राचार्य डॉ.अविनाश बोर्डे यांचा पाहुण्यांच्या
हस्ते सत्कार करण्यात आला.वर्ग 11वी च्या कला शाखेतील भूमि मांडेकर व स्नेहल मिर्झापूरे यांनी
स्वागत गित म्हटले.प्रा.सुशीला मळसने यांनी प्रास्ताविक केले.प्राचार्य डॉ. रामेश्वर भिसे यांनी स्वागत पर भाषण केले,
प्रा.अरविंद मंगळे यांनी मार्गदर्शन पर भाषण केले. डॉ. अविनाश बोर्डे यांनी सत्काराला उत्तर दिले.
वर्ग 11 वी च्या वाणिज्य शाखेच्या विद्यार्थिनी ने नटरंग या गाण्यावर नृत्य सादर केले.वर्ग 11वी कला व वाणिज्य शाखेच्या मुलींनी
मायभवानी या गितावर नृत्य सादर केले त्यामध्ये अंजली पाटेकर, धनश्री अंबोरे, श्वेता तायडे,राणी डोमाळे,
साक्षी भोजने, श्रध्दा वानखडे, नंदिनी गवई या विद्यार्थीनींचा समावेश होता.यानंतर वर्ग 12 वी च्या विद्यार्थीनींनी शिवकन्या या गाण्यावर नृत्य सादर केले.
वर्ग 11वी कला शाखेतील विद्यार्थीनी भूमि मांडेकर हिने मल्हार वारी गाणे म्हटले.
यानंतर शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष केशवराव मेतकर यांनी अध्यक्षीय भाषण केले.
कार्यक्रमाचे संचालन प्रा.प्राजक्ता देशमुख यांनी केले तर आभार डॉ अर्चना पोटे यांनी मानले.
कार्यक्रमाला कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक बंधू व भगिनीं उपस्थित होते.
लेझीम पथकाची जबाबदारी प्रा.रिंढे यांनी तर नृत्याची जबाबदारी प्रा.भिसे ,प्रा.शिल्पा शिंदे ,
प्रा.फाले यांनी पार पडली. ग्रंथ दिंडी ची जबाबदारी प्रा. विद्या मोहुर्ले व प्रा.पांड्या,
मशाल ची जबाबदारी प्रा.वाघमारे यांनी स्विकारली होती तसेच व्हरच्युअल टूर व्हिडिओ बनवण्यासाठी
प्रा.अजित तराळे व डॉ नितिन नायसे यांनी महत्त्वाची भूमिका पार पडली. रोहन बुंदेले यांनी साउंड सिस्टीम ची व्यवस्था केली.
सर्व प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम यशस्वी झाला.
भोजन समारंभाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
Read Also : https://ajinkyabharat.com/danpur-camp/