शिव–शंभू बैलजोडीला प्रथम क्रमांक; सामाजिक एकतेचे प्रतीक ठरला मुंडगावचा पोळा उत्सव

शिव–शंभू बैलजोडी अव्वल

अकोट- तालुक्यातील संत नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंडगाव येथे ग्रामपंचायतीच्या वतीने सार्वजनिक पोळा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

या उत्सवात विविध जाती-धर्माचे शेतकरी आपापल्या बैलजोड्यांसह सहभागी झाले होते.ग्रामपंचायतीतर्फे उत्कृष्ट बैलजोडीची निवड करून तिचा शाल,

श्रीफळ व झुल देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी प्रभाकर नेमाजी निन्हाळ यांच्या ‘शिव–शंभू’ बैलजोडीने प्रथम क्रमांक पटकावला.

या जोड्याचा सत्कार सरपंच तुषार पाचकोर, ग्रामीण पोलीस ठाण्याचे ठाणेदार किशोर जूनघरे, माजी जि.प. सदस्य रमेश खलोकार व

पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विधीता चराटे यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षपद रमेश खलोकार यांनी भूषवले.

कार्यक्रमाला ठाणेदार किशोर जूनघरे, पीएसआय मीनाक्षी काटोले यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, स्थानिक मान्यवर, पत्रकार आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेतकऱ्यांनी बैलजोड्यांना पारंपरिक पद्धतीने सजवून विविध देखावे साकारले होते. त्यामुळे पोळा उत्सवाने सामाजिक एकतेचा सुंदर संदेश दिला.

Read also :https://ajinkyabharat.com/devrit-shetakyanani-enthusia/