शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे यांच्या पुढाकाराने मीटणार घरकुल धारकांचा प्रश्न

शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे यांच्या पुढाकाराने मीटणार घरकुल धारकांचा प्रश्न

अकोट तालुका प्रतिनिधी

गेल्या कित्येक वर्षांपासून अकोट शहरातील कमिटी फाईल,राजेंद्र नगर,खानापूर वेस,इंदिरा नगर तसेच

अकोट शहरातील घरकुलच्या प्रश्नांसाठी शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे तशेच मा नगरसेविका विजया बोचे

Related News

यांनी न.प.प्रशासनाला वारंवार निवेदन दिले तसेच घरकुलच्या विषयासंदर्भात प्रशासनाला जाग करण्यासाठी

आमरण उपोषण सुद्धा केले.शासनाच्या २.० या पंतप्रधान घरकुल आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांचा २०११ पूर्वीच्या

जागेच्या टॅक्स पावतीची झेरॉक्स,आधार कार्ड,रेशन कार्ड,नळ बिल,लाईट बिल इत्यादी कागदपत्रे प्रशासनाने मागितले होते.

शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे यांनी सर्व घरकुल धारकांचे ऑनलाइन अर्ज भरून मागितलेले सर्व कागतपत्रे व सर्व लाभार्थ्यांना सोबत

न.प.मुख्याधिकारी डॉ.नरेन्द्र बेंबरे यांच्या दालनात जाऊन त्यांच्या समवेक्ष सर्व अर्ज जमा केलेत यावेळी मुख्याधिकारी यांनी सर्व

घरकुल धारकांचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याचे ग्वाही दिली तशेच शहरामध्ये काही लोकांचे घर त्यांच्या तीन ते चार पिढ्या झालेल्या असून ते अतिक्रमण मध्ये आहे.

शासनाच्या नवीन नियमाप्रमाणे त्यांच्या जागा नियमाकृत कराव्या लागतात यासाठी मुख्याधिकारी यांनी उपविभागीय अधिकारी

यांच्याकडे तो प्रस्ताव पाठवून त्या जागा सुद्धा नियमाकृत करण्यात येतील असे आश्वस्त केले यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे,

माजि नगर सेवक अंनिस विलास जाधव प्रकाश बरेठिया पप्पू थोरात भिकू गटकळ विनायक सरदार निरंजन तेलंगोटे नरेश गावरगुरु अंबादास

तेलंगोटे सुमित ठाकूर आनंद शिवरकार गजानन शिवरकार विजय कागळे संजय गाडगे

श्रीराम शहरे परवेज भाई गजानन सोनेकर लक्ष्मीनारायण मंडले आदींसह नागरिक व बहुसंख्य ने महिला उपस्थित होते.

Read Also :  https://ajinkyabharat.com/mahavitaran-cha-gazab-karbara-brash-padlelya-current-electric-tarela-touch-both/

Related News