शिवसेना (उद्धव) चा ट्रॅक्टर मोर्चा

शिवसेना (उद्धव) चा ट्रॅक्टर मोर्चा

अकोला

विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी आणि कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)

ने आज अकोल्यात जोरदार ट्रॅक्टर मोर्चा काढला.

Related News

अकोल्यातील क्रिकेट क्लब मैदानापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हजारो शेतकऱ्यांचा लोंढा

धडकला आणि सरकारविरोधात घोषणाबाजी करत रोष व्यक्त करण्यात आला.

ट्रॅक्टर मोर्चा आणि शेतकऱ्यांचा उद्रेक

या ट्रॅक्टर मोर्चात विदर्भातील सहा जिल्ह्यांमधून शेतकरी सहभागी झाले होते.

अकोल्यात झालेल्या आंदोलनात शेतकऱ्यांनी कर्जमाफी, वीजबिल माफ करणे,

हमीभाव लागू करणे, आणि सातबाऱ्यावरून कर्ज हटवणे अशा अनेक मागण्या मांडल्या.

जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

आमदार नितीन देशमुख यांचा सरकारवर हल्लाबोल

मोर्चादरम्यान शिवसेना (ठाकरे गट) आमदार नितीन देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली.

“फडणवीस यांनी निवडणुकीआधी कर्जमाफीच्या मोठमोठ्या घोषणा केल्या होत्या, पण आजही शेतकऱ्याचा सातबारा कोरा नाही.”

“जर मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर हिवाळी अधिवेशनात लाखो शेतकऱ्यांना घेऊन विधानभवनावर धडक देऊ,” असा इशाराही त्यांनी दिला.

सरकारवर वाढता दबाव

शिवसेना (ठाकरे गट) च्या या आंदोलनामुळे विदर्भातील शेतकरी प्रश्न पुन्हा एकदा केंद्रस्थानी आले आहेत.

आत्महत्येचे प्रमाण कमी करण्यासाठी केवळ घोषणांपेक्षा ठोस अंमलबजावणी हवी, असा शेतकऱ्यांचा सूर आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/pahalgam-hallyamage-hamasachan-naw-connection-ughd/

Related News