जि.प.शाळा लोहारी खुर्दमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी

जि.प.शाळा

अकोट पंचायत समिती अंतर्गत जि.प.शाळा लोहारी खुर्द येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात महाराजांच्या प्रतिमेचे पूजन आणि पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी ‘शिवगर्जना’ देत शालेय परिसर देशभक्तीच्या वातावरणाने उजळून टाकला.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा सुमेधा डोबाळे होत्या, तर प्रमुख अतिथी म्हणून मुख्याध्यापक नितीन धोरण, तसेच शिक्षिका सोनाली निचळ आणि रुपाली ढवळे उपस्थित होत्या. विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित भाषणे, गीते आणि नाटिका सादर करून उपस्थितांचे मन जिंकले. कार्यक्रमादरम्यान अंजली इंगळे, नैना डोंगरे, गौरी म्हैसने, सलोनी वानखडे, आरुषी वानखडे, दिव्या वानखडे, प्रीती पाखरे, क्रांती वानखडे, गुंजन म्हैसने, अनुष्का सपकाळ, प्रणाली वानखडे, सृष्टी वानखडे, आचल सपकाळ, प्राची डोंगरे, कृष्णाली डोबाळे, श्रद्धा वानखडे, पियुष सपकाळ, शौर्य वानखडे आणि पियुष लालसरे यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

शिक्षिका सोनाली निचळ व रुपाली ढवळे यांनी शिवाजी महाराजांचे शौर्य, दूरदृष्टी, स्वराज्याची संकल्पना आणि आदर्श प्रशासन याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक नितीन धोरण यांनी विद्यार्थ्यांना केवळ बाह्य रूपावर नाही, तर महाराजांचे विचार आत्मसात करून प्रामाणिक, शिस्तबद्ध आणि राष्ट्रप्रेमी नागरिक बनण्याचे आवाहन केले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक नितीन धोरण, सर्व शिक्षकवृंद आणि शापोआ कर्मचारी भुजिंगराव इंगळे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचा शेवट उपस्थितांचे आभार मानून आणि देशभक्तीची जाणीव पुन्हा जागृत करत सांगता करण्यात आला.

read also :  https://ajinkyabharat.com/hilite-group-gifts-car-to-employees-20-crore-car-gifts-to-47-employees/