शिर्डीत भिकाऱ्यांची मोहीम; “मी ISRO अधिकारी” म्हणताच पोलिसही गोंधळले!

शिर्डीत भिकाऱ्यांची मोहीम; "मी ISRO अधिकारी" म्हणताच पोलिसही गोंधळले!

शिर्डी मध्ये नुकत्याच झालेल्या भिकारी यांच्या धडपडीमध्ये 50 पेक्षा जास्त भिकाऱ्यांना पोलिसांनी त्यांच्या ताब्यात घेतले होते.

यामध्ये काही भिकारी तर चक्क इंग्रजीमध्ये भीक मागताना आढळून आले आहे.

विशेष म्हणजे एका भिकाऱ्याने तो स्वतः आय.एस.आर.ओ. माझी अधिकारी असल्याचे सांगितले आहे.

Related News

हे ऐकून पोलीस सुद्धा चक्रावले होते.

दरम्यान या व्यक्तीस ताब्यात घेऊन नंतर त्याला सोडून देण्यात आल्याची  माहिती सुद्धा मिळाली आहे.

त्यामुळे या विषयावरून लोकांमध्ये जोरदार चर्चा रंगलेली आहे.

या कारवाईत ताब्यात घेतलेला के. एस. नारायण नावाचा व्यक्ती केरळचा रहिवासी असल्याचे समोर आले.

शिर्डी पोलीस, नगरपरिषद आणि साई संस्थान यांच्या संयुक्त प्रयत्नातून ही मोहीम राबवण्यात आली.

नारायण यांच्या दाव्यानंतर पोलिसांनी त्यांची माहिती खरी की खोटी हे तपासण्यास सुरुवात केली आहे.

 ‘तो’ व्यक्ती नेमका काय म्हणाला? 

यावेळी के. एस. नारायण म्हणाले की, मी एम. कॉम. पर्यंत शिकलो आहे.

इस्त्रोमध्ये नोकरी करत होतो. आता निवृत्त झालो आहे. माझा मुलगा युकेमध्ये शिक्षण घेतो.

साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी मी शिर्डीला येतो. यावेळी नाशिकमध्ये माझी बॅग चोरीला गेली,

त्यात आधारकार्ड, आयकार्ड आणि पैसे होते. म्हणून भाविकांकडून पैसे मागत होतो.

आज संध्याकाळी मी सिंकदराबादला जाणार होतो.

मी पीएसएलव्ही, जीएसएव्ही आणि चांद्रयान मोहिमांदरम्यान इस्त्रोमध्ये होतो.

श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरचे संचालक ए. राजराजन माझे मित्र आहेत.

पोलिसांनी त्याला इतर भिकाऱ्यांपासून वेगळं ठेवले असून त्यांचे स्टेट बँकेचे खाते आणि इतर माहिती तपासली जात आहे.

शिर्डी पोलीस नारायण यांच्या दाव्यांची पडताळणी करत आहेत. ते शिर्डीत कसे आले आणि त्यांचे म्हणणे कितपत खरे आहे,

याचा शोध घेतला जात आहे. दरम्यान या व्यक्तीस ताब्यात घेऊन नंतर सोडून देण्यात आले आहे.

दोघांना बेड्या

दरम्यान, अहिल्यानगर येथे गावठी कट्टे विक्रीसाठी आलेल्या दोन संशयित

आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत अटक केली आहे.

त्यांच्या ताब्यातून गावठी कट्टा, जिवंत काडतूस व मोबाईलसह ५६ हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

शुक्रवारी राजेंद्र बाळु ससाणे (27) व अमोल उर्फ युवराज साहेबराव ढावरे

(28, दोघे रा. नायगाव, ता. जामखेड) हे गावठी कट्टा विक्रीसाठी अहिल्यानगरमध्ये आले असल्याची खबर पोलिसांना मिळाली.

या व्यक्ती सध्या तारकपूर येथील हॉटेल थापर इनजवळ थांबले असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांच्या

पथकाने तत्काळ त्या ठिकाणी धाव घेत संशयितांना ताब्यात घेतले.

पोलिसांनी पंचासमक्ष केलेल्या झडतीमध्ये त्यांच्याकडे एक गावठी कट्टा, एक जिवंत

काडतूस मोबाईल असा एकूण 56 हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला.

पोलिसांनी तो जप्त केला आहे.

त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत कट्टा व काडतूस सचिन अंकुश गायकवाड (रा. नायगाव) याच्याकडून खरेदी केल्याची कबुली दिली.

सध्या सचिन गायकवाड पसार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Related News