मणेरा यांचे विकासाच्या मुद्याकडे लक्ष केंद्रीत; विद्यमान आमदारांना रोखण्याचे ठाकरे गटापुढे मोठं आव्हान आहे.
भाईंदर/विजय काते : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात प्रचारसभांना मोठा वेग मिळाला आहेे.
निवडणुकीच्या या रिंगणात मुख्यत्त्वाने शिवसेना शिंदे गट
Related News
आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यात अतीतटीची लढत दिसून येत आहे.
अशातच आता मिरा-भाईंदरमधील ओवळा-माजिवडा गावात शिंदे आणि
ठाकरे गटाचे शिवसैनिक आमने सामने आले आहेत.
त्यामुळे माजिवडा मतदारसंघात नरेश मणेरा यांच्या विरुद्ध एकनाथ शिंदे शिवसेनेचे प्रताप सरनाईक अशी लढत आहे.
त्यामुळे या निवडणुकीत दोन्ही पक्षांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे.
ओवळा-माजिवडा मतदारसंघाच्या एक तृतियांशपेक्षा थोडा अधिक भाग मिरा-भाईंदर शहरात समाविष्ट आहे
. या मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक, ठाकरे गटाचे नरेश मणेरा आणि मनसेचे संदीप पाचंगे अशी लढत आहे.
असं असलं तरी सरनाईक आणि मणेरा यांच्यातच थेट लढत अपेक्षित आहे. सरनाईक यांचा गेल्या 15वर्षांपासून असलेला दांडगा जनसंपर्क,
विकासकामांचा धडाका आणि त्या तुलनेत नरेश मणेरा यांचा मिरा-भाईंदरमधील मतदारांना असलेला नवखा चेहरा,
ठाकरे गटाची असलेली मर्यादित ताकद. यामुळे प्रताप सरनाईक यांना रोखण्याचे मिरा-भाईंदरमधील ठाकरे गटापुढे मोठे आव्हान आहे.
विधानसभा क्षेत्र 146ओवळा माजीवाडा परिसरातुन उद्धव बाळासाहेब ठाकरे
गटाच्या मार्फत व महाविकास आघाडीच्या वतीने नरेश मणेरा यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
महायुती संदर्भात बातम्यांसाठी इथे क्लीक करा
नरेश मणेरा यांनी विकासाच्या मुद्यावर लक्ष केंद्रीत केल आहे.मणेरा मिरा भाईंदर शहरात सभा घेत आहेत.
लोकांशी भेटी गाठी घेत आहेत प्रचार करत आहेत व लोकांचा देखील त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे
.मिरा भाईंदर शहरात दुपारी 2 च्या सुमारास आयोजित केलेल्या पत्रकार परिषद घेतली.
पत्रकारांशी संवाद साधताना मणेरा म्हणाले की, मी लोकांपर्यंत पोहचत आहे
आणी विकास कसा होईल याकडे मी जिंकून आल्यावर लक्ष देणार आहे, असं त्यांनी सांगितले आहे.
पंतुप्रधान मोदी यांच्या संदर्भात बातम्यांसाठी इथे क्लिक करा
मणेरा यांनी प्रतिस्पर्धी असणाऱ्या सरनाईक यांच्यावर देखील अनेक आरोप केले आहेत.
सरनाईक यांनी स्वतःच्या फायद्या करता निधी वापरले आहेत, स्वतःच्या घरातील लोकांची नावं अनेक वास्तुंना दिली आहेत.
त्यामुळे त्यांच्या मार्फत फक्त स्वतःच्या फायद्या करता सर्व गोष्टी केल्या जातं असल्याचे मनेरा यांनी सांगितले आहे
.उमेदवार जाहीर झाल्यापासून त्यांनी निरनिराळ्या परिसरात लोकांसोबत बैठक आयोजित केल्या आहेत
व यात लोकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली आहे.
मणेरा यांची मेहनत व राजकारणातील कारकीर्द व त्यांच्या मार्फत करण्यात आलेला विकास काम यामुळे लोक त्यांच्याकडे येत आहेत.
त्यामुळे या निवडणुकीत ठाकरेगटाचा उमेदवारच जिंकून येणार असं विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.