‘लाडकी बहीण योजने’वरून संजय राऊत यांचा शिंदे सरकारवर निशाणा

राज्य

राज्य सरकारने काही दिवसांआधी ‘लाडकी बहीण योजना’ जाहीर

केली. या योजनेचा लाखो महिलांनी लाभ देखील घेतला आहे. अनेक

महिलांच्या खात्यात या योजनेचे पैसे जमा झाले आहेत. याच योजने

Related News

वरून विरोधी पक्ष मात्र सरकारला घेरत आहे. 1 हजार 500 रुपये

देण्यापेक्षा सरकारने बहिणींची अब्रु वाचवावी, अशा शब्दात शरद पवार

यांनी लाडकी बहीण योजनेवर टीका केली. त्यानंतर आता शिवसेना ठाकरे

गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी सरकारवर टीका केली आहे.

संजय राऊतांनी नरेंद्र मोदी यांचं नाव घेत निशाणा साधला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडमधल्या ‘लाडली बहन’ योजनेला बोगस

बोलले होते. तेच भाषण महाराष्ट्रात ऐकवा. हे डबल स्टॅंडर्डचे लोक आहेत.

नरेंद्र मोदी यांच्या मानसिक संतुलनाबाबत आम्हाला चिंता लागली आहे.

महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना योग्य मग झारखंडमध्ये योजना बोगस

कशी? हे भाजपच्या लोकांचं सडक डोकं आहे. मी पंतप्रधानपदाचा अपमान

करत नाही. पण मोदींचं हे विधान आहे, असं संजय राऊत म्हणाले.

राज्यात निवडणुका कधी होणार हे एकनाथ शिंदे ठरवणार नाहीत. तर

निवडणूक आयोग सांगेल. मोदी- शहांच्या आदेशानंतर निवडणुक आयोग

निवडणुका जाहीर करेल. भाजपच्या सांगण्यानुसार निवडणुका होणार आहेत.

राज्यातील 14 प्रमुख महापलिकांच्या निवडणुका होत नाहीयेत. या निवडणुका

तेव्हाच होतील, जेव्हा त्यांना विश्वास येईल. शिंदेंनी निवडणूक आयोगाचा पदभार

घेतला आहे का? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/rainfall-forecast-in-other-states-including-maharashtra-in-the-next-4-days/

Related News