शेतकऱ्यांची  शंभर टक्के नुकसानभरपाईची मागणी

शेतकरी राजा ग्रुपच्या निवेदनावरून जिल्हाधिकाऱ्यांची पाहणी

पातुर तालुक्यात अतिवृष्टीची पाहणी

पातुर तालुक्यात सलग तीन वेळा झालेल्या अतिवृष्टीमुळे व ढगफुटी सदृश पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीनसह इतर पिके पाण्याखाली गेल्याने शेतकरी हताश झाले असून, त्यांना सरसकट व शंभर टक्के विमा भरपाई देण्याची मागणी होत आहे. या घटना व निवेदनाची दखल अजिंक्य भारत नेही घेतली आहे .श्री शेतकरी राजा ग्रुपच्या माध्यमातून सादर करण्यात आलेल्या निवेदनावर विचार घेऊन जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी पातुर तालुक्याला भेट देत प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांच्यासोबत कृषी अधिकारी शंकर किरवे, पातुर तहसीलदार वानखडे, कृषी अधिकारी राऊत, पंचायत समिती बीडीओ नायसे,  विस्तार अधिकारी लव्हाळे उपस्थित होते. यावेळी चांनी येथील तलाठी ठाकरे, हिवरा येथील तलाठी नळकांडे तसेच चानी मंडळातील कृषी अधिकारी गांधी यांनीही पाहणी केली.पाहणीदरम्यान श्री शेतकरी राजा ग्रुपचे सेवक रवि सोनोने, ज्ञानेश्वर गाडगे, अशोक इंगळे, यश घुगे, कुणालदेव सोनोने, बंडू इंगळे, नादानंद सोनोने, मंगेश इंगळे आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.शेतकऱ्यांचे  संपूर्ण पिक उद्ध्वस्त झाल्याने त्यांना सरसकट व शंभर टक्के विमा भरपाई मिळावी, अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली.

जिल्हाधिकारी वर्षा मीना चानी मंडळात भेट दिल्यानंतर यासंदर्भात आश्वासन दिले.

Related News

read also : https://ajinkyabharat.com/essential/

Related News