शेतकऱ्यांसाठी मोठा संधीमार्ग उघडला

यवतमाळच्या केळी आंतरराष्ट्रीय बाजारात

यवतमाळ – यवतमाळ जिल्ह्यातील कळंब चिंतामणी येथील केळी आता आंतरराष्ट्रीय बाजारात पोहोचली आहेत. प्रगतिशील शेतकरी रफिक कुरेशी यांच्या केळींची साईराम एक्स्पोर्ट कंपनी मार्फत पहिल्यांदाच इराणमध्ये निर्यात करण्यात आली आहे.साईराम एक्स्पोर्टचे मालक हनुमंत खबाले व दीपक मंजुळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा व्यवहार पूर्ण झाला. तसेच, मॅग्नस फार्मचे तुषार नलवडे यांचे विशेष सहकार्यही या प्रक्रियेत लाभले. यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेची दारे खुले झाली आहेत.यापूर्वी ग्रामीण भागातील केळी प्रामुख्याने पुणे, मुंबई आणि देशातील इतर काही शहरांमध्येच पाठवली जात होती, मात्र आता ती आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पोहोचत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळत असून त्यांची आर्थिक समृद्धीकडे वाटचाल सुरू झाली आहे.या यशामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचे नियोजन आंतरराष्ट्रीय मागणी लक्षात घेऊन करण्याची संधी मिळाली असून, यवतमाळमधील कृषी क्षेत्रासाठी हा एक मोठा टप्पा ठरला आहे.

READ ALSO :  https://ajinkyabharat.com/bhartaasathi/