शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्याचा उपक्रम

सेवा पंधरावाडा अंतर्गत चावडी वाचन

अकोट चावडीवर रस्ता अदालत जनसंवाद कार्यक्रम : – महसूल पंधरावाडा अंतर्गत शासन परिपत्रक वाचन, रस्ता अदालतीत शेतकऱ्यांचे समस्या नोंदवून मार्गदर्शन

अकोट  – अकोट भागातील शेतकऱ्यांच्या रस्ता समस्या व इतर संबंधित प्रश्न सोडवण्यासाठी सेवा पंधरावाडा अंतर्गत चावडी वाचन आयोजित करण्यात आले. दिनांक २९/८/२०२५ रोजी शासन परिपत्रक वाचन करून जमाबंधी आयुक्त यांच्या मानक कार्यपद्धतीनुसार महसूल पंधरावडा नुसार अकोट मंडळात दिनांक २४ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता नरसिंग महाराज मंदिर हॉलमध्ये बहुसंख्य शेतकऱ्यांना लोक अदालत जनसंवादासाठी उपस्थित राहण्याचे आव्हान करण्यात आले.अकोट भाग १ व भाग २ मधील ग्राम महसूल अधिकारी वानरे व मोहोकार यांच्या सहकार्याखाली ग्राम महसूल अधिकारी शहर चावडी स्तरावर शिवार फेरीनुसार सभा आयोजित केली गेली. या सभेत नकाशात असलेले तसेच नकाशात नसलेले शेतरस्ता याबाबत शेतकऱ्यांशी संवाद साधण्यात आला.

 मुख्य मुद्दे आणि मार्गदर्शन

– नकाशात नसलेले शेतरस्ता कसे घेतले जातील?
– नकाशात असलेल्या रस्त्यांचे महसूल पंधरावडा अंतर्गत सातबारा नोंदी कशा प्रकारे करण्यात येणार?
– रस्त्यांबाबत उद्भवणाऱ्या वाद टाळण्यासाठी कोणत्या पद्धती अवलंबाव्यात?

या सर्व मुद्द्यांवर जनसंवादाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन अकोट उपविभागीय अधिकारी मनोज लोणारकर, अकोट तहसीलदार सुनील चव्हाण, अकोट निवासीनायब तहसीलदार मनोज मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली अकोट मंडळ अधिकारी  गणेश भारती यांनी केले.

 शेतकऱ्यांचे समाधान

शेतकऱ्यांनी या रस्ता अदालतीच्या माध्यमातून आपले समस्या मोकळेपणाने मांडल्या व शासनाच्या परिपत्रकानुसार योग्य तो मार्गदर्शन व उपाययोजना करण्यात आल्याचे समाधान व्यक्त केले. यामुळे स्थानिक शेतकऱ्यांच्या समस्या जलद आणि कार्यक्षमतेने सोडवण्याचा मार्ग उघडला गेला आहे. या उपक्रमामुळे शासनाचे महत्त्वाचे परिपत्रक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले असून, रस्ता विवादांचे निराकरण करत स्थानिक विकासाला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

read also : https://ajinkyabharat.com/teaching-officer-dr-arvind-mohra-yanchaya-hasta-hansanit/