शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने चक्काजाम आंदोलन…

शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने चक्काजाम आंदोलन

चिखली/प्रतिनिधी

जिल्हाप्रमुख वैभव राजे मोहिते यांच्या मार्गदर्शनाने व गणेश काकडे तालुका प्रमुख यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या

प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी जनशक्ती पक्षाच्या वतीने दिनांक 24 जुलै रोजी वरवंड

बंगला फाट्यावर चक्काजाम आंदोलन आंदोलन करण्यात आले.

शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफी अपंगांना अनुदान, शेतमालाला त्वरित भाव मिळावा, बी-बियाणे व खताच्या किमती कमी कराव्यात.

या प्रमुख मागणीसाठी प्रहारच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले.

यावेळी काही वेळा पर्यंत वाहतूक ठप्प झाली होती. पोलीस प्रशासनाने आंदोलकाविरुद्ध

कारवाई करत गणेश काकडे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना अटक केली.

जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत संघर्ष चालूच राहील.

मागण्या मान्य न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी प्रहारच्या वतीने देण्यात आला.

यावेळी बुलढाणा तालुकाप्रमुख गणेश काकडे डोंगर खंडाळा शाखा अध्यक्ष राम खरात,

अशोक चावरे, मोहन शिंदे, गोविंद चावरे, शिवराज राठोड, गोपाल पवार यांच्यासह शेतकरी, कष्टकरी मजूर व दिव्यांग उपस्थित होते.

Read Also : https://ajinkyabharat.com/balapur-talukyatiyeal-juna-andura-this-illegal-liquor-man-raid/