शेतकऱ्यांच्या कापसाला योग्य भाव द्या

भाववाढ न झाल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा!

पातूर :“सत्ताधारी व राज्यकर्त्यांना शेतकरी हा महत्त्वाचा वाटत नाही. शेतकऱ्यांसाठी येणारा काळ संघर्षाचा आहे. 5 ऑक्टोंबरपर्यंत जर शासनाने शेतकऱ्यांच्या कापसाला ६ हजार ते १० हजार रुपये व सोयाबीनला १० ते १५ हजार रुपये भाव दिला नाही, तर तीव्र आंदोलन छेडले जाईल,” असा ठाम इशारा माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी पातूर येथील सभेत दिला.ते पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलायला सत्ताधाऱ्यांकडे वेळ नाही. निसर्गाच्या कचाट्यात शेतकरी सापडला असून, दररोज नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून १० ते १५ शेतकरी आत्महत्या करत आहेत. “भाववाढीसाठी शासनाला आपण भाग पाडू. वेळप्रसंगी कलेक्टरांच्या ऑफिसवर किंवा पालकमंत्र्यांच्या घरी घुसूनही आंदोलन करू,” असा इशारा त्यांनी दिला.पातूर येथे आयोजित हक्क यात्रेच्या निमित्ताने सिद्धाजी महाराज सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे आयोजन प्रहारचे शुभम उगले यांनी केले होते.अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री बच्चू कडू होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रहारचे कार्याध्यक्ष बल्लू जंजाळ उपस्थित होते.व्यासपीठावर गजानन लोखंडकर, कुलदीप वसू, सुशील फुंडकर, जिल्हा संपर्कप्रमुख नितीन आगे, माजी नगराध्यक्ष हिदायत खान, शेतकरी नेते सुनील गाडगे, काँग्रेस सचिव अक्षय राऊत, शेतकरी जिल्हा समन्वयक विनोद राऊत, शिवसेना माजी सदस्य देवलाल डाखोरे, सागर कढोने, मनसेचे डॉ. प्रशांत लोथे, काँग्रेसचे राजेश गावंडे, चंदू बारताशे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.या सभेला मोठ्या संख्येने शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग व नागरिक उपस्थित होते.28 सप्टेंबर रोजी होणाऱ्या भव्य आंदोलनात शेतकरी व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विजयकुमार ता., नामदेव खराडे, संतोष घावट, संतोष इंगळे, दिव्यांग विभागाचे यश मेतकर, सचिन तायडे, गोपाल चतरकर, राहुल वाघमारे यांच्यासह प्रहारचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.

read also:https://ajinkyabharat.com/navratriotsavat-bhavikanchi-mandiai/

Related News