मलकापूर : तीन दिवसांपूर्वी या जिल्ह्यात एका शेतकरी दाम्पत्याने एकाच झाडाला गळफास घेत जीवन संपवलं तरी पण
अद्यापही सरकारला जाग येत नाही. शेतमालाला भाव नाही, कर्जमाफीचे आश्वासनाची विसर पडला आहे.
कहर म्हणजे राज्याचे कृषी मंत्री रम्मी खेळतात. शेतकरी बांधवांची नुसती चेष्टा केली जात आहे.
तरी बांधवांनो तुम्ही कोणत्याही परिस्थितीत खचू नका, कुणी कर्ज मागायला आले तर त्याला झोडपा,
परंतु स्वतःचा अनमोल जीवन संपवू नका असे आवाहन करीत आपण सर्वांनी एक होऊन सरकारला
कर्जमाफी करण्यास भाग पाडू असे आश्वासन स्वाभिमानी पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष दामू अण्णा इंगोले यांनी केले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मलकापूर तालुक्यातील मौजे देवधाबा येथे २७ जुलै रोजी युवक प्रदेशाध्यक्ष दामू
अण्णा इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी मेळाव्याचे आयोजन युवक जिल्हाध्यक्ष निलेश नारखेडे यांनी केले होते.
पुढे बोलतांना दामू अण्णा इंगोले यांनी सरकार शेतकरी विरोधोत राबवित असलेल्या धोरणावर ताशेरे ओढले.
निवडणुकी पूर्वी जाहीर नाम्यात फडणवीस यांनी शब्द दिला होता सरकार बहुमतात येऊ द्या सातबारा कोरा कोरा करू
परंतु अजूनही सातबारा कोरा केला नाही यावर संताप व्यक्त केला. तर युवक जिल्हाध्यक्ष निलेश नारखेडे बोलतांना म्हणाले की,
एकीकडे सत्तेतील नेत्यांची विविध योजनांखाली पैशाची उधळपट्टी सुरू असताना कर्ज माफी करण्यासाठी सरकारचे पाय मागे वळतात .
बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा आला नाही, सामान्य शेतकऱ्यांना जाती धर्मात गुंतवून आपला राजकीय डाव साधावा हेच सरकारचे धोरण आहे .
सध्या सर्वीकडे स्मार्ट मीटर लावणे सुरू आहे. स्मार्ट मीटर ही अदानीची कंपनी असून मोदी आणि अदानी दोघांनी मिळून
सामान्य माणसाची लूट हे सरकार करणार आहे. आता या पुढे कोणीही स्मार्ट मीटर लावणार नाही, जबरदस्ती केली
तर मला कॉल करा शेतकरी संघटित व्हावा या उद्देशाने चळवळ टिकली पाहिजे,
बापाच्या घामाला दाम भेटला पाहिजे त्या साठी आता शेतकऱ्यांची पोरं उठून पेटली आहे .
हे या सरकारने ध्यानात ठेवावे असा गंभीर इशारा दिला. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष बाळू ठाकरे, देवधाबा सरपंच देवकुमार सोळंके,
उपसरपंच शिवदास सुरडकर, विनायक बोरसे , मनीराम बोरसे, सोपान सपकाळ, विनायक सपकाळ, निलेश चंदेल,
सुहास कुलकर्णी, समाधान बोरसे, बाळू बोरसे, दिपक पाचपोर, विशाल मंडवाले, मधुकर शेळके,वासुदेव बोरसे, सुधीर दैवतन्य, पराग बोंडे,
गोपाल सातव, दिलीप घाटे, रुपेश गोरले, प्रदीप राजपूत, सागर वाघ आदींची प्रामुख्याने उपस्थित होती. या मेळाव्यात परिसरातील शेकडो शेतकरी बांधव सहभागी झाले होते.
Read Also : https://ajinkyabharat.com/kavayatrene-inzori-complex-dumdumoon-galle/