शेतकऱ्यांना जावा लागतो नदीच्या पाण्यातून !
चंदन जंजाळ
बाळापूर ताप्र
चौकट
गेल्या कित्येक पिढ्या या नदीच्या पात्रातून आपली शेतीची मशागत करण्याकरिता जातो भारता कृषी प्रधान देश गणला जातो
आणि शेतकरी देशाचा पोशिंदा याच ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या जीवावर देशात अन्न पुरविला जातो
परंतु अशा कित्येक शेतकऱ्यांना मृत्यू असे झुंज देत शेतीची मशागत करावे लागतो अशा
ठिकाणी शेतकऱ्यांना पर्यायी व्यवस्था सरकारने निर्माण करून देण्याची मागणी वाडेगावातील शेतकरी करत आहेत.
यंदा पावसाळा चांगला झाल्याने सध्या स्थिती निर्गुणा नदीच्या पात्रात मोठी वाढ नदीपलीकडे वाडेगावातील
शेतकऱ्यांची किमान 30 ते 33 टक्के शेतकऱ्यांची जमीन असल्याने त्या जमिनीची मशागत करण्याकरिता
शेतकऱ्यांना जीवघेणे प्रवास करीत आपल्या शेतीकडे मार्ग काढत आहेत. पावसाने सध्या विराम घेतल्याने
शेतकरी आपल्या बैल गाडी तसेच मजुर घेऊन जातात एकीकडे सरकार शेतकऱ्यांसाठी पिएम किसान योजना
राबवित आहे जर शेतीसाठी रस्ते निर्माण केले तर शेतीचे उत्पन्नामध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणात वाढ करतील
व सुखी संपन्न होतील अशा वेळस वाडेगाव येथील निर्गुणा नदीमधून जाताना शेतकर्यासह मजुर कधी लिंबु तोडणी तर कधी
जमिणीची अवजारे घेऊन नदी प्रवास करावा लागतो पातूर तालुक्यातील चौंडीच्या धरणाचे विसर्ग होत असल्याने
नदीला खुप मोठे पाणी आहे कित्येक वेळा वाडेगावतील शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधी कडे आपली उठा मांडली
परंतु शेतकऱ्यांच्या व मजुरांच्या समस्या कडे लक्ष दिले जात नाही अजून किती दिवस हा प्रवास करावा लागते
व कधी जाण्या करीता पर्याय उपलब्ध होईल अशी चर्चा शेतकऱ्यांमध्ये होत आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/gujarati-sweet-mart-samor-koan-ghaun-firnara-gajaad/