अकोला : सर्पमित्रांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर अजगर जंगलात सोडण्यात आला
अकोला शहरालगत खडकी शिवारात मोठी घटना घडली आहे.
शहापुरे यांच्या शेतात तब्बल 12 फुटांचा अजगर आढळून आला.
या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून शेतकरी
आणि शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सध्या शेतीचे काम सुरू असताना अचानक शेतात अजगर दिसल्याने ग्रामस्थ घाबरले.
तातडीने स्थानिक सर्पमित्र अजित देशमुख यांना पाचारण करण्यात आले.
त्यांनी प्रवीण हुंडीवाले, सतीश गवळी, प्रवीण गवळी, राजेश गवळी,
अतुल लंगोटे यांच्यासह ग्रामस्थांच्या मदतीने शर्थीचे प्रयत्न करून अजगराला सुरक्षितरित्या पकडले.
यानंतर हा अजगर निसर्गाच्या सानिध्यात जंगलात सोडून देण्यात आला.
योग्य वेळी दक्षता घेतल्याने कोणतीही हानी झाली नाही.
ग्रामस्थांनी दिलासा व्यक्त करत सर्पमित्रांचे आभार मानले.
Read also : https://ajinkyabharat.com/excessive-observation/