उपविभागीय अधिकारी यांना निवेदन
अकोट
अकोट ,वन्य प्राण्यांच्या त्रासामुळे होणारे पिकाचे नुकसानाबाबत उपाययोजना करणेबाबत समस्त शेतकरयांनी निवेदन दिले आहे,
लामकाणी, रौंदळा, देवरी, बळेगाव, मुंडगाव, आलेवाडी शेत शिवारा मध्ये सध्या विविध पिके पेरलेली असुन
सध्यास्थितीत सदर पिके हे प्राथमिक स्थितीत असुन अत्यंत नाजूक आहेत असे असतांना सदर लामकाणी,
रौंदळा, देवरी, बळेगाव, मुंडगाव, आलेवाडी शिवारात रोही, रानडुकर,हरीण, माकड तसेच इतर वन्यप्राण्यांचा खुप त्रास वाढला आहे.
असे असतांना संबंधित विभागा मार्फत सदर वन्य प्राण्यांचा योग्य बंदोबस्त करण्याची निवेदनात मागणी केली आहे
तसेच न केल्यास आम्हा शेतकऱ्यांना रोही व रानडुक्कर यांची शिकार करण्याची परवानगी देण्यात यावी जेणे करुन आम्ही
आमच्या पिकाचे रक्षण स्वतः करु शकतो व आमचे होणारे नुकसान कमी करु शकतो, करीता निवेदन देण्यात आले.
प्रत्येक शेतकरी हा आपल्या शेती कामास व्यस्त् असुन संपुर्ण वर्षभराचे नियोजन हया पिकांवर अवलंबुन असते शेतक-यांन वर
औकाळी पाऊस,कमी जास्त् पाऊस अश्या नैसर्गीक आपत्तीला समोरे जावे लागते व तो स्व खुशिने समोर जातो व स्विकारतो.
गेल्या काही वर्षांनपासुन शेतकऱ्यांनवर वन्य प्राण्यांचे आव्हान समोर घेऊन ठाकले आहे,
पिकांचे रक्षणाकरीता रात्र दिवस रखवाली ठेवुण सुदधा आतोणात नुकसान करतांना वन्य प्राणी दिेसत आहे,
शेत शिवाराला कित्येक वेळा हया जंगली प्राण्यांनी फस्त् केलेली आहे.यामध्ये शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे
शेती करावी की शेती सोडून द्यावी की आत्महत्या करावी असा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकलेला आहे,
तरी वन्यजीवाचे संबंधित विभागाने बंदोबस्त करण्याबाबत समस्त शेतकरी वर्गामार्फत निवेदन देण्यात येत आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/nagpanchami-for-nagpanchami/