वाडी अदमपूर परिसरातील शेत रस्त्यांचे काम शेतपानंद योजनेअंतर्गत तात्काळ करावे — सरपंच रुपेश राठी यांचे निवेदन
तेल्हारा : वाडी अदमपूर, जाफ्रापूर आणि ईसापुर शिवारातील शेतपानंद योजनेअंतर्गत शेतीसाठी असलेल्या शेत रस्त्यांवरील अतिक्रमण लवकरात लवकर हटवावे, तसेच या रस्त्यांना ग्रामपंचायतीच्या क्रमांकाची नोंद करावी, अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे.या संदर्भात सरपंच रुपेश राठी यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी, उपसरपंच, ग्रामपंचायत पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी तेल्हारा तहसीलदार समाधान सोनवणे व तेल्हारा पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले.शेतकऱ्यांनी या निवेदनात शेत रस्त्यांवरील अतिक्रमण तातडीने हटवून, शेतकऱ्यांच्या दैनंदिन कामकाजासाठी आवश्यक असलेल्या रस्त्यांचे काम सुरु करण्याची मागणी केली आहे. त्यांनी याची त्वरित दखल घेऊन कामांना सुरुवात करण्याची अपेक्षा व्यक्त केली.सरपंच रुपेश राठी यांनी सांगितले की, या रस्त्यांच्या दुरुस्तीमुळे शेतकऱ्यांना पिकांचे नांगरकाम, पाणीपुरवठा आणि इतर शेतीशी संबंधित कामे सुरळीत पार पाडता येतील.
read also : https://ajinkyabharat.com/raj-uddhav-yutivar-smita-thackeray-first-response/