शेत रस्त्याचे रूपांतर तलावात : शेतकरी हतबल

शेत रस्त्याचे रूपांतर तलावात : शेतकरी हतबल

पातुर तालुका प्रतिनिधी
पातुर तालुक्यातील सस्ती खेट्री पिंपळखुटा शिरपूर चतारी सायवणी चान्नी सावरगाव उमरा पांगरा सुकळी चांगेफळ आदीसह

तालुक्यातील प्रत्येक गावातील शेत रस्त्यांचे रूपांतर तलावात झाल्याचे चित्र आहे. अनेक शेत रस्त्याचे काम करण्यात आले,

मात्र रस्त्याच्या बाजूने नाली काढण्यात आली नसल्याने साचलेला पाणी जाण्यासाठी मार्ग नसल्याने रस्त्यावरच पाणी साचत आहे.

Related News

तसेच अनेक गावातील रस्त्याची दुरुस्ती अद्यापही करण्यात आली नाही, त्यामुळे रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे.

पावसाळ्यात रस्त्यावर पाणीच पाणी साचल्याने शेतकऱ्यांना शेतात जातच येत नसल्याने शेतीची कामे रखडली आहे.

पावसाळ्यापूर्वी रस्त्याची दुरुस्ती करण्याची गरज असताना संबंधितांच्या दुर्लक्षामुळे दुरुस्ती अभावी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने शेतकऱ्यांचे हाल होत आहे.

शेतापर्यंत बैलगाडी नेता येत नसल्याने शेतकऱ्यांना शेती कामासाठी खत बियाणे फवारणी औषध व शेती अवजारे डोक्यावर घेऊन जावे लागत आहे.

याकडे संबंधितांनी दखल घेऊन रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी शेतकऱ्याकडून होत आहे.

सस्ती येथे अनेक शेत रस्त्याची दुरुस्ती थातूरमातूर करून लाखोंचे देयक हडपण्यात आले,

प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी रस्त्यासाठी शिवसंग्रामसह शेतकऱ्याकडून दोन वेळा रस्ता रोको आंदोलन सुद्धा करण्यात आले,

परंतु प्रशासनाकडून अद्यापही दखल घेतली गेली नाही परिणामी शेतकऱ्यांचे हाल होत आहे.

रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास पुन्हा रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल

दिलीप परनाटे जिल्हाध्यक्ष शिवसंग्राम

प्रशासनाचा ढसाळ कारभार : शेतकरी वैतागले !

पातुर तालुक्यातील प्रत्येक गावातील शेत रस्त्यांची परिस्थिती बिकट आहे, शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी प्रत्येक पक्षाकडून आश्वासन दिले जाते ,

मात्र शेतकऱ्यांची परिस्थिती “जैसे थे” आहे. त्यामुळे प्रशासनाच्या ढसाळ कारभारामुळे शेतकरी वैतागले आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/pandit-vitthal-bhaktancha-mahapur/

 

Related News