शेकडो नागरिकांचे अमूल्य दान; इंजोरीत गणेशोत्सवानिमित्त रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

शेकडो नागरिकांनी केले अमूल्य रक्तदान

मानोरा–ग्राम इंजोरी येथे गणेशोत्सवानिमित्त आयोजित करण्यात

आलेल्या रक्तदान शिबिरात शेकडो दात्यांनी उत्स्फूर्त सहभाग

नोंदवत समाजोपयोगी परंपरेला मोठी चालना दिली.

महात्मा फुले रक्तदाता ग्रुप महाराष्ट्र राज्य यांच्या सहकार्याने

आयोजित या शिबिरात तब्बल शंभरहून अधिक

दात्यांनी रक्तदान करून रुग्णसेवेसाठी हातभार लावला.

रक्तदान शिबिराचे उद्घाटन धनराज दिघडे यांच्या हस्ते महात्मा ज्योतिराव फुले

यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून झाले.

या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी अजय जयस्वाल, दुर्योधन काळेकर,

रवींद्र काळेकर, देवानंद हळदे, शंकर नागोलकर, आकाश हळदे,

सतीश दिघडे, सागर ढोक, खुशाल ढोरे, लीलाधर पायघन, विठ्ठल डहाके,

विशाल नरेकर, आकाश ढाकुलकर, सचिन वानखडे, विशाल वानखडे,

सतीश भवाने, अंकुश काळेकर, प्रशांत दिघडे, विनायक इंगळे, रुग्णसेवक मयूर शेंडे,

संस्थापक अध्यक्ष तुषार जंगले व बादल पायघन आदींनी परिश्रम घेतले.

गणेशोत्सवानिमित्त समाजोपयोगी उपक्रमांची परंपरा जोपासणाऱ्या

इंजोरी ग्रामस्थांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत असून, रुग्णांना वेळेवर

रक्त उपलब्ध व्हावे यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता

असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

Read also :https://ajinkyabharat.com/chandeet-randukarancha-havoc-soybean-pikachi-nasadi-shetkari-hathbal/