शेगावकडे मार्गस्थ होणाऱ्या भाविकांच्या गाड्यांना टोल माफी द्यावी – जिल्हा काँग्रेसची मागणी

शेगावकडे मार्गस्थ होणाऱ्या भाविकांच्या गाड्यांना टोल माफी द्यावी - जिल्हा काँग्रेसची मागणी

चिखली /प्रतिनिधी

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विदर्भाचे दैवत श्री संत गजानन महाराज यांची पायी पालखी खामगावहून शेगांवकडे मार्गस्थ होत आहे.

त्या अनुषंगाने हजारो भाविक भक्त मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहाने या पालखी सोहळ्यात सहभागी होतात.

या पार्श्वभूमीवर चिखली खामगाव रोडवरील उदयनगर टोल नाक्यावर येणाऱ्या भाविकांच्या गाड्यांना टोल घेऊ नये अशा

प्रकारच्या सूचना जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी टोल प्रशासनाला दिल्या आहे.

त्यासंदर्भात टोल नाक्यावरील अधिकारी श्री तिवारी यांच्याशी भ्रमणध्वनी वरून संपर्क करून कुठल्याही प्रकारच्या भाविकांचे गाड्याना टोल घेऊ नये जर

घेतल्यास काँग्रेस हे प्रकरण आपल्या पद्धतीने हाताळेल असा सज्जड दम देखील यावेळी माजी आमदार राहुल बोन्द्रे यांनी दिला आहे.

तसेच काँग्रेस कडून सर्व भाविकांना विनंती देखील करण्यात आली आहे भाविकांनी कोणत्याही प्रकारचा टोल

(Fastag द्वारे देखील) भरू नका. जर अशा प्रकारचा कुठलाही प्रयत्न झाला, तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधावा.