शेगावजवळील मन नदीला पूर; अकोला-बुलढाणा संपर्क तुटला,

शेगावजवळील मन नदीला पूर; अकोला-बुलढाणा संपर्क तुटला,

शेगाव (प्रतिनिधी) – अकोला आणि बुलढाणा जिल्ह्याला जोडणारा शेगावजवळील महत्त्वाचा मार्ग मन

नदीच्या वाढलेल्या पाणी पातळीमुळे पूर्णपणे बाधित झाला आहे.

नदीवरील पुलावरून पाणी वाहू लागल्याने अकोला-बुलढाणा जिल्ह्याचा संपर्क तुटला असून, दोन्ही बाजूंनी वाहतूक ठप्प झाली आहे.

सध्या या मार्गावर पुलाचे काम सुरू आहे आणि एक पर्यायी रस्ता देण्यात आला होता,

मात्र सकाळपासून झालेल्या जोरदार पावसामुळे तो पर्यायी मार्गही पाण्याखाली गेला आहे.

गेल्या आठवड्याभरापासून परिसरात पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र आज सकाळपासून झालेल्या मुसळधार पावसाने

नदी-नाल्यांना पूर आल्यासारखी स्थिती निर्माण केली आहे. शेगाव-लोहारा दरम्यानचा पूल पूर्णपणे जलमय झाला आहे.

  प्रशासनाचा इशारा:

नदीवरील पुलावरून पाणी वाहत असल्याने नागरिकांनी या भागात वाहतुकीचा किंवा

पूल ओलांडण्याचा कोणताही प्रयत्न करू नये, असे आवाहन स्थानिक प्रशासनाने केलं आहे.

  सतर्कतेचा सल्ला:

स्थानिक ग्रामस्थांना आणि प्रवाशांना काही काळासाठी सुरक्षित स्थळी थांबण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

पूरस्थिती लक्षात घेता आपत्कालीन यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत.

Read Also : https://ajinkyabharat.com/telhara-tehsil-office/