पातूर | प्रतिनिधी
पातूर शहरातील भावना पब्लिक स्कूलमध्ये शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी चिमुकल्यांचा जल्लोष आणि उत्साह पाहण्यासारखा होता.
गुलाबाच्या फुलांनी स्वागत, डोक्यावर राजाराणीचे मुकुट, शिक्षकांनी केलेले औक्षण,
Related News
बालगीतांचा गजर, आणि हातात नवी कोरी पुस्तके… अशा आनंददायी वातावरणात शाळेच्या नव्या पर्वाची सुरुवात झाली.
पहिल्याच दिवशी गोड खाऊची मेजवानी
शाळेतील प्रत्येक शिक्षक आपल्या पद्धतीने विद्यार्थ्यांना रमवण्याचा प्रयत्न करत होता.
नवीन वर्ग, नवीन चेहेरे आणि आईवडिलांपासून दूर जाताना अनेक चिमुरड्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले.
काही रडवेल्या विद्यार्थ्यांना चॉकलेट्स, आईस्क्रिम्स आणि कार्टून दाखवून शांत करण्यात आले.
वर्गात सुरुवातीला रडणारे बाळगोपाळ शेवटी खेळणी, गाणी आणि गोष्टींमध्ये गुंतले.
वर्गखोल्यांचे कार्टून आणि फुग्यांनी आकर्षक रूपांतर
वर्गखोल्या रंगीबेरंगी फुगे, खेळणी आणि कार्टून सजावटीने सजवल्या होत्या. शिक्षकांनी “छोटा भीम”,
“डोरेमॉन” अशा आवडत्या पात्रांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचं मन जिंकण्याचा यशस्वी प्रयत्न केला.
दुपारच्या सत्रात लाजरे-घाबरलेले विद्यार्थी हळूहळू मैत्री करायला लागले, खेळू लागले आणि एकमेकांशी संवाद साधायला लागले.
पालकांच्या मनात चिंता, पण चेहऱ्यावर समाधान
शाळेसमोर सकाळपासून पालकांची प्रचंड गर्दी होती.
मुलं रडत तर नाही ना, याची काळजी त्यांना वाटत होती. मात्र, जेव्हा सुट्टीच्या वेळी मुलांनी धावत आई-बाबांना मिठी
मारली आणि तुटक्या शब्दांत शाळेचा अनुभव सांगितला, तेव्हा त्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य उमटलं.
शाळेच्या यशस्वी आयोजनामागे शिक्षकांचे परिश्रम
या विशेष दिवशी शाळेचे संस्थापक अमोल सोनोने, कार्यकारी संचालिका सरिता तायडे, मुख्याध्यापिका सरोज सुरवाडे,
तसेच शिक्षकवृंद – पल्लवी गवई, दीपमाला पखाले, अश्विनी रोहणकार, पल्लवी बिहाडे, प्रिया उपर्वट,
रेणुका सोनोने, प्रणिती खवणे, गायत्री सरनाईक, प्रणाली थोराईत, गौरी कुकडकर, ज्योती चव्हाण,
सोनल हरणे आणि मोनाली तायडे यांनी विद्यार्थ्यांना नव्या शैक्षणिक प्रवासाच्या दाराशी स्वागत करत एक अविस्मरणीय अनुभव दिला.
“पहिला दिवस अविस्मरणीय!”
असं म्हणत आज शाळेच्या पहिल्या दिवसाचे अनेक आठवणींचे क्षण बालमने आपल्या छोट्या हृदयात साठवून घेत आहेत.
Read Also : https://ajinkyabharat.com/rich-palace/
