शताब्दी महोत्सवात रक्तदानाचा उत्सव, ७५ दात्यांचा सहभाग”

रक्तदान हा श्रेष्ठदान: कारंजा शिबिरात उत्साहात ७५ दात्यांनी सहभाग

कारंजा (लाड) – स्थानीक श्री बजरंग गणेश उत्सव मंडळ आणि

श्री हनुमान मंदिर संस्थान बजरंग पेठ कारंजा यांच्या

वतीने गणेश शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित

भव्य रक्तदान शिबिर यशस्वीपणे पार पडले.

शिबिराचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष दत्तराज डहाके,

व्यवस्थापक भाऊरावजी देशमुख, अध्यक्ष किरिट रायचुरा,

उपाध्यक्ष पंकज कनोजे, तसेच मंडळाचे पदाधिकारी गणेश यंदे,

संतोष धोंडगे, अशोक जमनानी, सचिन कनोजे, गजानन टेम्पे आदी उपस्थित होते.

रक्तदान शिबिरात ७५ रक्तदात्यांनी सहभाग घेतला,

तर धावती भेट ठाणेदार दिनेशचंद्र शुक्ला यांनी दिली.

आयोजक समितीच्या वतीने रक्तदात्यांना चहा, बिस्किट, नाश्ता, फळे व पाणी

याची सोय केली गेली तसेच सर्व रक्तदात्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमात वाशिम ब्लड बँकच्या डॉक्टर टीमने तसेच

बजरंग मंडळाच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी विशेष योगदान देत रक्तदान यशस्वी केले.

Read also :  https://ajinkyabharat.com/scorpio-zodiac-satsangacha-benefits-mile-hirechaya-vyasasathi-kal-sadhya/