बारामती : गेल्या अनेक वर्षापासून शरद पवारांचे मतदान बारामतीत नाही. याबद्दल विरोधकांकडून विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांना उत्तरं देताना राष्ट्रवादीचे नेतेदेखील अडखळायचे.
पण यंदा असं होणार नाही. जेव्हा पवार कुटुंबातच फूट पडली आहे, तेव्हा शरद पवार यांनी आपलं एक हक्काचं मतदान बारामतीत आणलं आहे.
श्रमलेल्या लेकीसाठी बाप नारळाचं पाणी, लढणाऱ्या लेकीसाठी बाप बुलंद कहाणी असं बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे प्रत्येक सभेत सांगत असतात.
Related News
‘मला चटके देताना एवढंच म्हणायचे…’, गरम सळईचे चटके दिलेल्या तरूणानं सांगितली धक्कादायक आपबीती
मुलीच्या छेडछाडीप्रकरणी भाजपचा माजी नगरसेवक आरोपी, सध्या शिंदे गटात!”
शिंदे सरकारच्या योजनेनं गोची; ‘लाडक्या भावां’मुळे भलतीच अडचण; कॅबिनेटमध्ये वादळी चर्चा
Ajit Pawar : ‘पुण्यात भगवा फडकवायचाय’, एकनाथ शिंदेंच्या वक्तव्यावर अजित पवारांनी दिलं असं उत्तर
स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपीची तिरडी; पुण्यात रणरागिणींचं अनोखं आंदोलन!
मोठी बातमी! मध्य रेल्वेवर दोन दिवस विशेष ब्लॉक; CSMT वरुन सुटणाऱ्या ५९ लोकल, ‘या’ मेल-एक्स्प्रेस रद्द, पाहा वेळापत्रक
गणपत गायकवाड यांच्या मुलाचं नाव चार्जशीटमधून वगळलं, ठोस पुरावे नाहीत, पोलिसांचं स्पष्टीकरण
संतोष देशमुख हत्या प्रकरणात चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे विधान, म्हणाले, आमच्या सरकारने ज्या बाबी…
बुडत्याचा पाय खोलात! शेअर मार्केटमध्ये काही तरी मोठं घडणार; Nifty कोसळण्याच्या उंबरठ्यावर
मुंबई तापली, पाणीसाठा कमी! महापालिकेचं मुंबईकरांना महत्त्वाचं आवाहन
फडणवीसांमुळे घड्याळ आणि धनुष्यबाणाला मतं? सुरेश धसांच्या दाव्याने महायुतीत मतभेद!
“रेशनकार्डधारकांसाठी मोठी बातमी: रेशनसोबत मिळणार खास गिफ्ट!”
त्यांच्या या कवितेचा खरा अर्थ यावेळी मतदारांना पाहायला मिळणार आहे. कारण शरद पवारांनी त्यांचं हक्काचं मतदान मुंबईवरून बारामतीला हलवलं आहे.
यंदा त्यांच्या मतदानाचा पत्ता असणार आहे मुक्काम पोस्ट गोविंद बाग आणि मतदान केंद्र असणार आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळेगाव कॉलनी.
ज्येष्ठ नेते शरद पवार हे प्रथमच बारामतीमध्ये मतदान करणार आहेत. यापूर्वी ते मुंबई येथे मतदान करत होते.
२०१४ पर्यंत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बारामती शहरातील रिमांड होम येथे मतदान केले आहे. यावेळी त्यांच्या आमराई येथील जुन्या घराचा पत्ता दिला होता.
२०२४ साठी शरद पवार हे माळेगाव येथील गोविंद बाग या निवासस्थानाच्या नजीक असणाऱ्या जिल्हा परिषद शाळा माळेगाव या ठिकाणी मतदान करणार आहेत.
सुप्रिया सुळे व सुनेत्रा पवार यांच्यात सुरू असलेल्या अटीतटीच्या लढाईमध्ये शरद पवार यांचं मतदान आता बारामतीमध्ये असणार आहे.
त्यामुळे येथील राजकारणाला वेगळीच धार चढली आहे. शरद पवार या ठिकाणी मतदान करणार असल्याने आता या मतदानाला देखील महत्त्व आलं आहे.
यंदा प्रथमच शरद पवार माळेगावात मतदान करतील आणि बारामती लोकसभेच्या मतदारसंघात रिंगणात उभ्या असलेल्या आपल्या लेकीला हातभार लावतील.
शरद पवार यांचं मतदान बारामतीत नसल्याचा मुद्दा विरोधकांनी प्रचारात वापरला जातो.
उपमुख्यमंत्री असलेल्या आणि आता शरद पवारांना आव्हान देणाऱ्या अजित पवारांनीदेखील हा मुद्दा कदाचित प्रचारसभेत उपस्थित केला असता.
पण त्याआधीच शरद पवारांनी नवा डाव टाकला आहे. ते स्थानिक मतदार म्हणून या निवडणुकीत पहिल्यांदाच मतदान करणार आहेत.