शरद पवार, उद्धव ठाकरे, फडणवीसांच्या गाड्या फोडा-प्रकाश आंबेडकर

चिल्लर

चिल्लर लोकांच्या काय फोडता?

प्रकाश आंबेडकरांचे वादग्रस्त विधान. 

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर

Related News

हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. दक्षिण मुंबईतून ठाण्याला जाताना

त्यांच्या कारची तोडफोड करण्यात आली. काही दिवसांपूर्वी अजित पवार गटाचे

आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला.

गाडी तोडफोड प्रकरणावर सध्या राजकीय वातावरण तापले असताना

वंचित बहुनज आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी

खळबळजनक वक्तव्य केले आहे. चिल्लर लोकांच्या गाड्या काय फोडताय?

शरद पवार ,देवेंद्र फडवणीस,उद्धव ठाकरे यांच्या गाड्या फोडा

असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.

ते परभणीतील गंगाखेड येथे बोलत होते.

प्रकाश आंबेडकर आरक्षण बचाव यात्रेच्या निमित्ताने परभणीत आहेत.

परभणीतून ते आज गंगाखेड येथे गेल्यानंतर तिथे आयोजित जाहीर सभेत

त्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य  केले आहे.

तसेच जिंतेंद्र आव्हाड आणि अमोल मिटकरी यांना चिल्लर म्हणून देखील  संबोधले आहे.

प्रकश आंबेडकर म्हणाले,  मिटकरी जितेंद्र आव्हाड यांच्यासारख्या

चिल्लर लोकांच्या काय गाड्या फोडताय? गाड्या फोडायच्या आहेत तर तुम्ही

शरद पवार, उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस यांच्या गाड्या फोडा.

बाळासाहेब आंबेडकरांच्या या वादग्रस्त विधानानंतर राजकीय वर्तुळात

याचे काय पडसाद उमटतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/duchakis-horrific-accident-led-to-death-of-9-month-old-chimukli/

Related News