शरद पवार, उद्धव ठाकरेंनी माझ्या नादी लागू नये -राज ठाकरें

भाजप विरोधात

अडथळे आणण्याचा प्रयत्न केला आहे. आताच सांगतो माझ्या वाटेला जाऊ नका,

नाहीतर सभाही घेता येणार नाही, माझी पोर काय करतील हे सांगता येत नाही

असे म्हणत  राज ठाकरेंनी  उद्धव ठाकरे, शरद पवारांना इशारा दिला आहे.

Related News

ते मराठवाड्यात माध्यामांशी बोलत होते.

महाराष्ट्रासारख्या प्रगतीशील राज्यात आरक्षणाची गरजच नाही या भूमिकेचा

पुनरूच्चार राज ठाकरेंनी केलाय. आपल्या दौऱ्याचा जरांगे पाटलांशी काहीही संबंध नव्हता,

मात्र आपल्याविरोधात जाणीवपूर्वक प्रचार करण्यात आला असा आरोप राज ठाकरेंनी केला.

राज ठाकरे म्हणाले, माझा आणि मनोज जरांगेचा संबंध नाही.

पण उद्धव ठाकरे आणि शरद पवार जरांगेच्या अडून राजकारण करत आहेत.

जरांगे पाटलांच्या अडून विधानसभेचे राजकारण सुरू आहे.

तुमचे राजकारण तुम्हाला लखलाभ. माझ्या नादी लागू नका. माझी पोर काय करतील

हे सांगता येत नाही.  उद्या माझे मोहळ उठले तर एकही सभा घेता येणार नाही.

माझ्या वाट्याला जाऊ नका. तुमच्याकडे प्रस्थापित आहेत माझ्याकडे विस्थापीत आहेत, असही ते म्हणाले.

Read also: https://ajinkyabharat.com/noidat-rave-party-police-raid/

Related News