मुख्यमंत्र्यांना सर्वपक्षीय बैठक बोलवण्याचा सल्ला
मराठा आरक्षणाचा तिढा सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कारण राजकाणातील चाणाक्य अशी ओळख असलेले राष्ट्रवादी
Related News
“राज्यातील सरकार ही लुटारू रचना” – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप
भारतमाला एक्सप्रेस हायवेवर ज्वलनशील केमिकलने भरलेला टँकर उलटला;
सीकर कृषी मंडीत भीषण आग;
हनुमान जयंतीनिमित्त भव्य धार्मिक आयोजन – भक्तांनी घेतला आनंद
पातूर येथे उत्साहात गुरु-शिष्य जयंती साजरी
दिल्ली विमानतळावर तात्पुरता बदल: T2 टर्मिनल बंद,
श्रीनगर – अमरनाथ यात्रा 2025 साठी नोंदणी प्रक्रियेची सुरुवात झाली आहे…
अंबेडकर जयंती शोभायात्रा दरम्यान युवतीसोबत छेडछाड;
आर्थिक सुबत्ता असेल तरच इतरांशी स्पर्धा करू शकतो : डॉ सुगत वाघमारे
“ब्लू ओरिजिन”ने रचला इतिहास; केटी पेरीसह ६ महिलांचा यशस्वी अंतराळ प्रवास
वाराणसी सामूहिक बलात्कार प्रकरण : डीसीपी चंद्रकांत मीणा हटवले; पंतप्रधान मोदी नाराज
खामगाव-नांदुरा रोडवर भीषण अपघात: बस आणि ट्रकची समोरासमोर धडक; ३ ठार, २० जण गंभीर जखमी
शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा
सोडवण्यासाठी लक्ष घातले आहे. ‘मराठा अरक्षणासाठी ओबीसी समाजात
नाराजीचे सूर आहेत. त्यामुळे दोन्ही समाजातील नेत्यांना एकत्र आणून
एक बैठक घ्यावी असा सल्ला त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला आहे.
महत्त्वाचे म्हणजे त्यांनी सर्वपक्षीय बैठक घेण्याचा सल्ला दिला आहे.
दोन समाजामध्ये कटुता निर्माण होणार नाही, यादृष्टीने पावलं टाकली पाहिजे.’
असेही त्यांनी सुचवले आहे.
प्रसार माध्यामांशी बोलाना शरद पवार यांनी म्हटले की, ‘नुकतीच मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यांना आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वपक्षीय बैठक बोलावावी.
आम्हीही उपस्थित राहू, आमची भूमिका असेल. मला खात्री आहे की
मुख्यमंत्री सर्वपक्षीय बैठक बोलावतील. केंद्रात 50% पेक्षा जास्त आरक्षण
देण्याचा अधिकार आहे. जर त्यांनी या समस्येकडे सकारात्मक पाऊल उचलले
तर आम्ही त्यांना सहकार्य करू.’, असे शरद पवार म्हणाले.
नुकतीच पुण्यात त्यांची पत्रकारपरिषद पार पडली. त्यात ते बोलत होते.
‘राज्यात सुरु असलेल्या मराठा आंदोलनावर नेत्यांनी भूमिका मांडावी,
अशी मागणी आंदोलक आणि विरोधी पक्षांकडून होत आहे.
राज्यातील सामाजिक परिस्थिती बिघडू नये यासाठी सर्व चितेत आहेत.
राज्यात 50 टक्क्यांच्या वर आरक्षण देता येत नाही. यासाठी सर्वांनी मिळून
केंद्र सरकारकडे आपली भूमिका मांडली पाहिजे. केंद्र सरकारने आरक्षणाबाबतची भूमिका
घेतल्यास त्याला आमचं समर्थन असेल’, असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं.
Read also: https://ajinkyabharat.com/us-conspiracy-to-oust-mala-sattetoon-sheikh-hasina/