शरद पवार- मुख्यमंत्र्यांची तासभर बैठक! राजकीय चर्चांना उधाण..

सद्या मराठा

सद्या मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून

राज्यातील वातावरण तापले आहे.

काही दिवसांपूर्वी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी

Related News

खासदार शरद पवार यांची भेट घेत सध्या राज्यातील वातावरण

बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

तुम्ही आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी केली होती.

विशेष म्हणजे शरद पवार यांनीदेखील या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला होता.

त्यांनंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांची

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पंधरा मिनिटे एकत्रित चर्चा झाली आहे.

एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्यात

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून 15 मिनिटे चर्चा झाली आहे.

या चर्चेत एकनाथ शिंदे यांनी शरद पवार यांना सरकारने

मराठा आरक्षणप्रश्नी आतापर्यंत काय प्रयत्न केले, याबाबत माहिती दिली.

शरद पवार यांनी याआधी सरकार मनोज जरांगे किंवा लक्ष्मण हाके यांना काय आश्वासन देत आहे

याबाबत विरोधी पक्षाला काहीच माहिती नसते असे बोलून दाखवले होते.

त्यानंतर आता शिंदे यांनी सरकारने मराठा आरक्षणासाठी आतापर्यंत काय काय केले आहे,

याची माहिती शरद पवार यांना दिली आहे.

या भेटीनंतर आता विरोधी पक्ष काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/sanjay-rautans-demand-to-stop-devendra-fadnavis/

Related News