शाहरुख खानची प्रकृती बिघडली; उष्माघाताचा त्रास झाल्याने किंग खान इस्पितळात दाखल

shah rukh khan

लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याची तब्येत अचानक बिघडली आहे.

उन्हामुळे त्याला त्रास झाल्याने त्याला इस्पितळात दाखल करावं लागलं आहे.

मुंबई- बॉलिवूडचा किंग खान असलेला अभिनेता शाहरुख खान याने आपल्या अभिनयाने सगळ्यांना वेड लावलं.

शाहरुखने आपल्या चित्रपटातून प्रेक्षकांची मनं जिंकली. तरुण असो किंवा बच्चेकंपनी सगळेच शाहरुखचे फॅन्स आहेत.

त्याच्या चाहत्यांची संख्या प्रचंड मोठी आहे. मात्र त्याच्या चाहत्यांच्या हृदयाचा ठोका चुकवणारी बातमी सध्या समोर येते आहे.

अभिनेता शाहरुख खान याला उष्माघाताचा त्रास झाला होता.

वाढलेल्या उन्हाचा त्याला त्रास झाला आणि त्याची प्रकृती अचानक खालावली.

तब्येत बिघडल्याने त्याला इस्पितळात दाखल करावं लागलं होतं. त्याच्यावर इस्पितळात उपचार सुरू होते.

शाहरुखला अहमदाबादच्या केडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं अशी माहिती मिळते आहे.

आता त्याची प्रकृती ठीक असून त्याला इस्पितळातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

काल २१ मे रोजी आयपीएल २०२४ च्या सीझनचा पहिला प्ले ऑफ पार पडला.

काल सनरायझर्स हैदराबाद आणि शाहरुखचा संघ कोलकाता नाइट रायडर्स या संघात लढत होती.

ही मॅच कोलकाताने जिंकली.

ही पहिली प्ले ऑफ मॅच पाहण्यासाठी कींग खान काल अहमदाबादला आला होता.

नरेंद्र मोदी स्टेडियमवर ही लढत खेळली गेली.

मात्र ही मॅच झाल्यानंतर शाहरुखला उष्माघाताचा त्रास जाणवू लागला.

वाढलेल्या उन्हामुळे त्याला त्रास झाला त्याची तब्येत खालावल्याने त्याला ताबडतोब अहमदाबादच्या केडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

त्याच्यावर तिथे उपचार सुरू होते. त्याच्या तब्येतीबाबत पुढील अपडेट हाती आली आह.

त्याला इस्पितळातून डिस्चार्ज मिळाला आहे. मात्र या बातमीने त्याचे काळजीत पडले आहेत.

शाहरुखच्या प्रकृतीबद्दलची बातमी आता सोशल मीडियावरही व्हायरल झाली आहे.

या बातमीने चाहत्यांना मोठा धक्का बसला. त्यामुळे शाहरुखचे चाहते सध्या त्याच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करताना दिसत आहेत.

ते आपल्या लाडक्या कलाकारासाठी देवाकडे प्रार्थना करताना दिसत आहेत.

मात्र शाहरुखची प्रकृती सध्या स्थिर आहे.

शाहरुखच्या कामाबद्दल सांगायचं तर तो यापूर्वी ‘पठाण’, ‘जवान’ आणि ‘डंकी’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटात दिसला.

आता चाहते त्याच्या पुढील प्रोजेक्टची वाट पाहत आहेत.

Read Also

https://ajinkyabharat.com/shikhar-since-i-was-15-16-years-old-know-what-janhvi-kapoor-said-about-her-boyfriend/