मुंबई:बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान आपल्या पहिल्याच प्रोजेक्टमुळे चर्चेत आला आहे. ‘द बॅड्स ऑफ बॉलिवूड’ या वेबफिल्मद्वारे त्याने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले आहे. १८ सप्टेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या या सिनेमाची विशेष स्क्रीनिंग बुधवारी झाली.
स्क्रीनिंगला बॉलिवूडमधील अनेक नामांकित सेलिब्रिटी उपस्थित होते. पण सर्वाधिक चर्चेत राहिली ती म्हणजे आर्यन खानची कथित गर्लफ्रेंड लारिसा बोन्सी. या सोहळ्यात तिच्या एन्ट्रीनं आणि पापाराझींना दिलेल्या पोजमुळे सोशल मीडियावर तिचे व्हिडिओ आणि फोटो तुफान व्हायरल होत आहेत.
लारिसा बोन्सी कोण आहे?
ब्राझिलियन अभिनेत्री आणि मॉडेल लारिसा बोन्सी याआधी बॉलिवूडमध्येही काम करुन गेली आहे. अक्षय कुमार आणि जॉन अब्राहमसोबतच्या ‘देसी बॉयज’ सिनेमातील “सुबह होने ना दे” या गाण्यातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर तिने अनेक जाहिरातींमध्ये आणि प्रोजेक्ट्समध्ये काम केले आहे. सोशल मीडियावरही ती कायम सक्रिय असून तिच्या चाहत्यांची मोठी संख्या आहे.
गेल्या काही महिन्यांपासून आर्यन आणि लारिसाच्या नात्याच्या चर्चांना जोर आला आहे. दोघांना अनेकवेळा एकत्र पाहिलं गेलं आहे. न्यू ईयर पार्टीत देखील हे कपल एकत्र स्पॉट झाल्याने त्यांच्या रिलेशनशिपची चर्चा अधिकच रंगली होती.
‘द बॅड्स ऑफ बॉलिवूड’चा स्टारकास्ट
आर्यन खान दिग्दर्शित या वेबफिल्ममध्ये लक्ष्य ललवानी, राघव जुयाल, बॉबी देओल आणि सहर बंबा प्रमुख भूमिकेत आहेत. विशेष म्हणजे करण जोहर, शाहरुख खान, रणवीर सिंग, सलमान खान, आमिर खान यांसारखे बॉलिवूडचे बिग स्टार्सही या प्रोजेक्टमध्ये झळकणार आहेत.
आर्यन खानच्या पहिल्याच दिग्दर्शन प्रोजेक्टला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरली आहे ती त्याची गर्लफ्रेंड लारिसा बोन्सी.
read also :https://ajinkyabharat.com/rape-episode/
