Shahid Afridi पुन्हा मैदानात उतरण्यास सज्ज – 40 वर्षांवरील T20 वर्ल्डकप 2025

Shahid Afridi

पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि अष्टपैलू Shahid Afridi 40 वर्षांवरील T20 वर्ल्डकप 2025 मध्ये खेळण्यासाठी सज्ज. स्पर्धा 21 नोव्हेंबरपासून कराचीमध्ये सुरू होणार आहे.

पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू Shahid Afridi पुन्हा एकदा मैदानात उतरण्यास सज्ज झाला आहे. 40 वर्षांवरील T20 वर्ल्डकप 2025 मध्ये त्याने भाग घेणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या आक्रमक खेळाने क्रीडाप्रेमींना नेहमीच मनोरंजन केले आहे, आणि आता त्याची ही नवी तयारी क्रिकेट चाहत्यांसाठी उत्साहवर्धक ठरणार आहे.

ही स्पर्धा पाकिस्तानच्या कराची येथे आयोजित करण्यात आली आहे. T20 वर्ल्डकप 21 नोव्हेंबरपासून सुरू होणार असून अंतिम सामना 1 डिसेंबरला खेळला जाणार आहे.

Related News

पाकिस्तान वेटरन्स क्रिकेट असोसिएशनने (PVC) बुधवारी निवेदन जारी करून स्पष्ट केले की, Shahid Afridi या स्पर्धेत खेळणार आहे. निवेदनात म्हटले आहे, “अष्टपैलू Shahid Afridi पुन्हा एकदा पाकिस्तानची जर्सी परिधान करण्यास सज्ज आहे. यावेळी 40 वर्षांवरील T20 वर्ल्डकप 2025 मध्ये खेळेल.

Afridi ने पाकिस्तानसाठी 27 कसोटी, 398 वनडे आणि 99 टी20 सामने खेळले आहेत आणि त्याने एकूण 476 षटकार मारले आहेत. गोलंदाजीतही त्याची कामगिरी उल्लेखनीय आहे; आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने 541 विकेट घेतल्या आहेत. आता क्रिकेट प्रेमींनी 40 वर्षांवरील T20 वर्ल्डकपमध्ये त्याची कामगिरी कशी राहील याकडे लक्ष केंद्रीत केले आहे.

READ ALSO : https://ajinkyabharat.com/major-action-taken-against-1xbet-scam-suresh-raina-and-shikhar-dhawans-assets-worth-rs-11-14-crore-seized/

Related News