शहरातील गुंड प्रवृत्तीचे ०२ सराईत आरोपी कलम ५६ महाराष्ट्र पोलीस कायदा प्रमाणे हद्द‌पार …!

शहरातील गुंड प्रवृत्तीचे ०२ सराईत आरोपी कलम ५६ महाराष्ट्र पोलीस कायदा प्रमाणे हद्द‌पार ...!

दि.२९.०७.२०२५

अकोला शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु नये तसेच विवीध प्रकारचे वारंवार गुन्हे करणा-या ईसमांवर

कायदयाचे धाक रहावे याकरीता पोलीस अधीक्षक श्री. अर्चित चांडक, अपर पोलीस अधिक्षक श्री. बी चंद्रकांत रेड्डी साहेब यांचे मार्गदर्शनामध्ये

प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणुन पो.स्टे. सिटी कोतवाली व पो.स्टे. अकोट फाईल. ह‌द्दीतील

१) गुलाम अली औलाद हुसेन वय ३५ वर्ष रा. ईराणी झोपडपट्ट्टी, अकोला,

२) अंबादास उर्फ सोनु रोहीदास थोरात वय २५ वर्ष रा. अण्णाभाऊ साठे नगर, अकोट फाईल,

अकोला या आरोपीं विरूध्द दाखल गुन्हयांचे स्वरूप पाहता त्यांचे विरूध्द महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५६ अन्वये अकोला

जिल्हयातुन हद्द‌पार करण्या बाबत प्रस्ताव तयार करून उपविभागीय दंडाधिकारी, अकोला यांचे कडे सादर करण्यात आला होता.

त्यानुसार उपविभागीय दंडधिकारी, अकोला यांचे आदेशान्वये उपरोक्त वर नमुद ०२ गुन्हेगारी प्रवृत्तीच्या ईसमांना अकोला

व बाळापुर तालुक्यातुन सहा महिण्याकरीता हद्द‌पार करण्यात आले आहे.

मा. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक साहेब यांनी अकोला आगामी सण-उत्सव काळात जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहुन शांतता रहावी या करीता

अश्या प्रकारचे गुन्हे करणारे व कारवाईस न जुमानणा-या सराईत गुन्हेगारी प्रवृत्तीचे ईसमांची माहिती संकलीत करण्याचे आदेश दिले

असुन त्यांचे विरूध्द वरील प्रमाणे प्रभावी प्रतिबंधक कारवाई करणे सुरू आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/sapkalancha-hallabol-triple-engine-government-gangus-of-maharashtra-state-dhudgus-suru/