शबाना आझमींच्या 75 व्या वाढदिवसाची रंगत!

75व्या वाढदिवसाची जादू :

मुंबई : बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित पार्टीत अविस्मरणीय दृश्य पाहायला मिळाले. या जंगी सोहळ्यात अभिनेत्री रेखा, माधुरी दीक्षित, उर्मिला मातोंडकर आणि विद्या बालन यांनी एकत्र येऊन डान्स सादर केला. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होत असून, चाहत्यांनी याला ‘दुर्मिळ क्षण’ असं म्हटलं आहे.

18 सप्टेंबरला झालेल्या या पार्टीत करण जोहर, मनिष मल्होत्रा, सोनू निगम, उर्मिला, माधुरी, विद्या, रेखा असे दिग्गज उपस्थित होते. पार्टीतील हायलाइट ठरला ‘कैसी पहेली है ये’ या गाण्यावर झालेला अभिनेत्रींचा धमाल डान्स. त्यांच्या सोबत शेवटी शबाना आझमीही थिरकल्या. रेखा स्वतः शबानांना स्टेप्स शिकवत होत्या, तर इतर अभिनेत्रीही मनसोक्त नाचताना दिसल्या.

सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओ

अभिनेता संजय कपूर यांनी हा व्हिडिओ आपल्या इंस्टाग्रामवर शेअर करत लिहिले, “बॉलिवूडच्या ओरिजिनल क्वीन्स एका मंचावर!” या पोस्टवर चाहत्यांचा लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव झाला आहे.

एका चाहत्याने लिहिलं, “सर्व दिग्गज अभिनेत्री एका फ्रेममध्ये पाहणं म्हणजे पर्वणीच.” दुसरा म्हणाला, “सर्व जणी आजही तेवढ्याच सुंदर आणि एनर्जेटिक दिसतात.”

जावेद अख्तर आणि शबाना आझमींचा कपल डान्सही चर्चेत

फराह खानने शबाना आझमी आणि जावेद अख्तर यांच्या कपल डान्सचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. दोघं मिळून ‘लिटिल लिटिल बेबी’ या गाण्यावर डान्स करताना दिसले. फराह खानने लिहिलं, “तर अशा प्रकारे तुम्ही पंच्याहत्तरीत प्रवेश करता. सदैव चिरतरुण राहा.”