छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत सेवा पंधरवाडा

छत्रपती

बार्शिटाकळी : छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत राष्ट्रनेता पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचे जन्मदिन (17 सप्टेंबर 2025) पासून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत (2 ऑक्टोबर 2025) महसूल सेवा पंधरवाडा साजरा करण्याचे शासनाचे निर्देशानुसार बार्शिटाकळी तालुक्यातील ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले.या अभियानाच्या पहिल्या टप्प्यात पाणंद रस्ते याबाबत शिवार फेरी हाती घेतली गेली. जिल्हाधिकारी अकोला  वर्षा मीना आणि उपविभागीय अधिकारी मुर्तिजापूर संदीपकुमार अपार यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शिटाकळी तालुक्यातील 35 गावांमध्ये शिवार फेरी आयोजित करण्यात आली. या मोहिमेत ग्राम महसूल अधिकारी (तलाठी), ग्रामसेवक, महसूल सेवक (कोतवाल), पोलीस पाटील आणि स्थानिक नागरिकांनी सक्रिय सहभाग घेतला.शिवार फेरीद्वारे गावातील शेत व पाणंद रस्त्यांची यादी तयार करण्यात आली, ज्यामध्ये नकाशावर दाखवलेले तसेच दाखवलेले नसलेले दोन्ही प्रकारचे रस्ते समाविष्ट केले गेले आहेत.आज दिनांक 17 सप्टेंबर 2025 रोजी बार्शिटाकळी तालुक्यातील ८० ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभा आयोजित करण्यात आली. मुख्यमंत्रि समृद्ध पंचायत राज अभियानाच्या पूर्व तयारीसाठी व शिवार फेरीत तयार करण्यात आलेल्या पाणंद रस्त्यांच्या यादीस ग्रामसभेच्या माध्यमातून मान्यता देण्यात आली. संबंधित ग्राम महसूल अधिकाऱ्यांच्या वाचनानंतर सर्व नागरिकांनी एकमताने रस्त्यांच्या यादीला अंतिम मान्यता दिली.आगामी पाच दिवसांत प्राथमिक टप्प्यातील एका गावातील निवडलेला शेत रस्ता भूमी अभिलेख विभागाद्वारे सिमांकन केला जाणार असून त्यावरील अतिक्रमण हटविण्याचे काम पुढे नेण्यात येणार आहे.तहसिलदार राजेश वझीरे यांनी स्थानिक नागरिकांना आवाहन केले आहे की, ग्रामसभेत मंजूर झालेल्या पाणंद रस्त्यांचे भूमी अभिलेख विभागाद्वारे मोजणी व सिमांकन करून आपले रस्ते मोकळे करून घ्यावेत. त्यांनी यासाठी सर्व नागरिकांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे सांगितले आहे.

read also : https://ajinkyabharat.com/non-fundkar/